Pakistan vs West Indies 3rd ODI : पाकिस्तानची फलंदाजी आज सपशेल अपयशी ठरली. पहिल्या दोन वन डे सामन्यांत दमदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांना रोखण्यासाठी वेस्ट इंडिजने आज कमालीचा डाव टाकला. कर्णधार निकोलस पूरन ( Nicholas Pooran ) जो यष्टिरक्षक आहे आज त्याने गोलंदाजीत हात आजमावले. आजच्या सामन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ तीन चेंडू टाकणाऱ्या पूरनने आज कमाल केली. त्याच्या गोलंदाजीसमोर १ बाद ८८ अशा सुस्थितीत असलेला पाकिस्तानचा डाव ५ बाद ११७ असा गडगडला. पूरनने ४ विकेट्स घेत पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजांना माघारी पाठवले.
फखर जमान व इमाम-उल-हक यांनी आज चांगली सुरुवात करताना पहिल्या विकेटसाठी ८५ धावा जोडल्या. १७व्या षटकात पूरनने ही भागीदारी तोडली. त्याच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात फखरचा ( ३५) त्रिफळा उडाला. कर्णधार बाबर आजम आज काही कमाल करू शकला नाही आणि हेडन वॉल्शने त्याला १ धावेवर माघारी पाठवले. पूरनने त्यानंतर मोहम्मद रिझवान ( ११), मोहम्मद हॅऱीस ( ०) यांना बाद केले. दरम्यान, इमामने सलग ७वे अर्धशतक झळकावले. त्यालाही पूरनने २३व्या षटकात चकवले. ६२ धावांवर इमाम बाद झाला. १७.१ षटकांत १ बाद ८८ अशा सुस्थितीत असलेला पाकिस्तानचा संघ पुढील ३९ चेंडूंत २९ धावांत ४ विकेट्स गमावून बसला.
Web Title: Before the third PAKvWI ODI, Nicholas Pooran bowled just three balls in international cricket, Today, the west indies captain bagged four wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.