Join us

बेन स्टोक्सने रुटला गोलंदाज बनवण्याचे वचन पूर्ण केले

Ind Vs Eng 2nd Test: ‘मी कायम जो रुटला सांगितले की, एक कर्णधार म्हणून तू कमी गोलंदाजी केलीस. त्यामुळे मी त्याला गोलंदाज बनविण्याचे वचन दिले होते आणि हे वचन मी पूर्णही केले,’ असे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 05:36 IST

Open in App

विशाखापट्टनम - ‘मी कायम जो रुटला सांगितले की, एक कर्णधार म्हणून तू कमी गोलंदाजी केलीस. त्यामुळे मी त्याला गोलंदाज बनविण्याचे वचन दिले होते आणि हे वचन मी पूर्णही केले,’ असे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने सांगितले. हैदराबाद येथील भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रुटची फिरकी इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली होती.

रुटने पहिल्या डावात चार बळी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात लोकेश राहुलचा महत्त्वपूर्ण बळीही मिळवला. या सामन्यात त्याने एकूण पाच बळी घेत इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्टोक्स म्हणाला, ‘कर्णधारपद सांभाळताना रुटने फार कमी गोलंदाजी केली. त्यामुळे मी त्याला गोलंदाज बनवण्याचे वचन दिले होते. रुट केवळ चेंडू फेकत नाही, तर खेळाचा वेगही वाढवतो.

टॅग्स :जो रूटबेन स्टोक्सभारत विरुद्ध इंग्लंड