किंग्स्टन : वर्ल्ड कप विजयाचा नायक, अॅशेस मालिकेतील तारणहार बेन स्टोक्सने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंड संघाला अविस्वसनीय विजय मिळवून दिले आहेत. इंग्लंडला पहिलावहिला वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यात स्टोक्सचा सिंहाचा वाटा आहे. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या अॅशेस मालिकेत त्यानं एकहाती खिंड लढवत इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत अश्यक्यप्राय विजय मिळवून दिला होता. त्यामुळेच इंग्लंडला मालिका बरोबरीत सोडवता आली. स्टोक्स आता इंग्लंड संघासाठी आणि तेथील क्रिकेट फॅन्ससाठी मोठा सेलेब्रिटीच आहे. यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या स्टोक्सच्या आयुष्यात सर्वकाही आनंदी आनंद आहे, परंतु भूतकाळात त्याच्या आयुष्यात अशी एक ट्रॅजेडी घडली आहे की ती ऐकताच आपलं मन अस्वस्थ होते.
बेन स्टोक्सचा मुळचा जन्म हा न्यूझीलंडचा.. इंग्लंडने वन डे वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी त्याच्या घरी कही खुशी कही गम असे वातावरण होते. कारण, ज्या देशात त्याच्या जन्म झाला त्याच देशाला त्यानं पराभूत केले होते. स्टोक्सच्या आयुष्यातील मनाला चटका लावणारी घटना घडलीय ती न्यूझीलंडमध्येच. SUN या वृत्तपत्राकडे दिलेल्या मुलाखतीत स्टोक्सच्या आईनं हा प्रसंग सांगितला अन् काळजाचा ठोकाच चुकला..