Ben Stokes Most Sixes, ENG vs NZ: इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स संघात पुनरागमन झाल्यापासून धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत बेन स्टोक्सने आपल्या दमदार खेळीची कमाल दाखवली. बेन स्टोक्सने या सामन्यात एक खास विक्रम आपल्या नावावर केला. स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक ठोकत मोठा पराक्रम गाजवला. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सने हा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा क्रिकेटपटू ठरला.
बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक ठोकले. त्याच्या आधी, ब्रेंडन मॅक्क्युलम आणि अॅडम गिलख्रिस्ट या दोन खेळाडूंनी अशी किमया साधली आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक षटकार ठोकणारे क्रिकेटविश्वात केवळ तीन खेळाडू आहेत. बेन स्टोक्सने हा विक्रम केवळ ८२व्या कसोटी सामन्यात केला. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू बनण्याची संधी आहे. यासाठी त्याला आणखी ८ षटकारांची गरज आहे. असे झाल्यास तो आपल्याच संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम याला मागे टाकेल.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार-
ब्रेंडन मॅक्युलम - १०७ षटकार
अॅडम गिलख्रिस्ट - १०० षटकार
बेन स्टोक्स - १०० षटकार
ख्रिस गेल - ९८ षटकार
जॅक कॅलिस - ९७ षटकार
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची गणना सध्याच्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास त्याने ८२ कसोटींमध्ये ११ शतकांसह ५ हजार २५५ धावा केल्या आहेत. या शिवाय बेन स्टोक्सच्या नावावर कसोटीत १७७ विकेट्सही आहेत.
Web Title: Ben stokes most sixes in test cricket records Adam Gilchrist Brendon McCullum England vs New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.