ख्राईस्टचर्च : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने शानदार कामगिरीच्या बळावर विश्वचषकात न्यूझीलंडच्या नागरिकांचे स्वप्न उद्ध्वस्त केले असले, तरीही ख्राईस्टचर्चमध्ये जन्मलेल्या या प्रतिस्पर्धी खेळाडूला केन विलियम्सनसोबत न्यूझीलंडचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
बेन स्टोक्स हा मूळचा न्यूझीलंडचा आहे. त्याचा जन्म ख्राईस्टचर्च येथे झाला. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तो इंग्लंडकडून खेळतो. दुर्दैवाने त्याला अंतिम सामना मायदेशाविरुद्ध खेळावा लागला. त्याने इंग्लंडकडून खेळताना उत्तम कामगिरी केली व आपल्या संघाला विजयी केले. पुरस्काराची घोषणा डिसेंबरमध्ये होईल.
असा आहे पुरस्कार...
‘न्यूझीलंडर आॅफ द इयर’ पुरस्कार सध्या किवीबँक न्यूझीलंडर आॅफ द इयर’ नावाने दिला जातो. मूळ न्यूझीलंडच्या व्यक्तीने विविध क्षेत्रात केलेल्या महान कार्यासाठी हा सन्मान प्रदान केला जातो. न्यूझीलंडमधील. आॅकलंड शहरामध्ये दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान केला जातो.
Web Title: Ben Stokes nominated for New Zealand's best player
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.