नवी दिल्ली – इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सनं(Ben Stokes) खळबळजनक खुलासा केला आहे. एका टॅबलेट गोळीमुळं बेन स्टोक्सचा जीव धोक्यात आला होता. येत्या ८ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या एशेज सीरीजपासून स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. मानसिक आरोग्य आणि बोटामध्ये झालेले फ्रॅक्चर या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून बेन स्टोक्सनं विश्रांती घेतली होती.
थोडक्यात जीव वाचला
डेली मिररच्या रिपोर्टनुसार, हा भयानक अनुभव बेन स्टोक्सनं शेअर केली आहे परंतु ती कधी आणि केव्हा घडली याबाबत त्याने मौन पाळलं आहे. बेन स्टोक्स म्हणतो की, मी एक गोळी घेतली होती. जी माझ्या गळ्यात अडकली. ही गोळी बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. जोपर्यंत ही गोळी बाहेर आली नाही तेव्हा मला माझा अंत जवळ आलाय असं वाटलं. मी खोलीत एकटाच होता आणि श्वासही घ्यायला येत नव्हता. हळूहळू ती गोळी नळकांडीतून पोटात गेली पण मी खूप घाबरलेलो होतो. डॉक्टरांच्या टीमनं मला तपासलं आणि त्यांनी सांगितले काय घडलं होतं असं त्यांनी सांगितले.
एशेजमध्ये बेन स्टोक्स परतत आहे
बेन स्टोक्स एशेज सीरीजसह पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये परतत आहे. हा क्रिकेटर आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात कॅच घेण्याच्या प्रयत्नात जखमी झाला होता. ज्यानंतर त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झालं होतं. बेन स्टोक्सनं क्रिकेटमध्ये पुन्हा परतण्यासाठी जास्त प्रयत्नही केले नाहीत. त्यामुळे तो खेळापासून अनेक काळ दूर राहिला. बेन स्टोक्स हा आयपीएलचा दुसरा टप्पा आणि क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या बाहेर होता.
जगातील सर्वोकृष्ट ऑलराऊंडर
बेन स्टोक्स सध्याच्या काळात जगातील सर्वोकृष्ट ऑलराऊंडर आहे. इंग्लंडसाठी खेळणारा हा खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजीसह फिल्डिंगमध्येही उत्तम कामगिरी करतो. विशेषत: २०१९ हे वर्ष बेन स्टोक्ससाठी खूप चांगले राहिले. एकट्याच्या जीवावर इंग्लंड टीमला त्याने कप जिंकवून दिला होता. त्यानंतर झालेल्या एशेज सीरीजमध्येही बेन स्टोक्सची कामगिरी पाहायला मिळाली.
Web Title: Ben Stokes says he almost choked on tablet in hotel room
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.