मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊची चौथ्या षटकात ३ बाद २३ धावा अशी अवस्था करत आरसीबीने आपला विजय जवळपास निश्चित केला होता. परंतु, मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पूरन यांनी सामन्याचे चित्र पालटताना स्फोटक अर्धशतक झळकावले. स्टोइनिसने कर्णधार लोकेश राहुलसह चौथ्या गड्यासाठी ४० चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली.
दोघे पाठोपाठच्या षटकात परतले. मात्र, पूरनने अवघ्या १५ चेंडूंत अर्धशतक ठोकत आयुष बदोनीसह सहाव्या गड्यासाठी ३५ चेंडूंत ८४ धावांची तुफानी भागीदारी केली. यामध्ये पूरनने तब्बल ५६ धावांचा चोप दिला. मोहम्मद सिराजने १७व्या षटकात त्याला बाद केल्यानंतर बदोनी, जयदेव उनाडकट, मार्क वूड, रवी बोश्नोई आणि आवेश खान यांनी लखनौला थरारक विजय मिळवून दिला. मात्र या सामन्यातील शेवटच्या षटकात आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने केलेल्या मंकडिंगचा प्रयत्नामुळे सोशल मीडियावर आजी-माजी क्रिकेटपटू यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.
पूरन, कोहली, डुप्लेसिस, मॅक्सवेल राहिले बाजूला; सामना संपल्यानंतर गौतम गंभीरच्या व्हिडिओची चर्चा
शेवटच्या चेंडूपूर्वी कर्णधार फॅफ आणि हर्षल पटेल यांच्यात संभाषण झाले. यानंतर हर्षल गोलंदाजी करायला गेला. बिष्णोई नॉन स्ट्राइकवर होता. अशा स्थितीत हर्षलने हुशारी दाखवत मंकडिंगचा प्रयत्न करत बिश्नोईला बाद करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न चुकला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने थ्रो करून बिश्नोईला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, चेंडूही स्टंपला लागला. आऊटचे अपील अंपायरने फेटाळले.
सदर प्रकरणावर इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार आणि चेन्नई सुपरकिग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यांनी देखील आपले मत व्यक्त केलं आहे. बेन स्टोक्स ट्विट करत म्हणाला की, पंचांनी याबाबत हुशारीने वागलं पाहिजे. कोणत्याही फलंदाजाने लवकर क्रीज सोडल्या ६ रनाची पेनल्टी द्यायला हवी. असे केल्यास कोणताही खेळाडू लवकर क्रीज सोडणार नाही, आणि यावरुन पुढे वाद होणार नाही, असं बेन स्टोक्सने म्हटलं आहे.
दरम्यान, गोलंदाजाने आपली अँक्शन पूर्ण केली होती, त्यामुळे बिश्नोई धावबाद झाला नाही. MCCच्या नियम 38.3.1.2 नुसार, जर नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाने क्रीझ सोडली असेल, आणि ते सुद्धा जेव्हा गोलंदाजाने त्याची क्रिया पूर्ण केली असेल आणि तो चेंडू फेकण्याच्या रिलीझ पॉइंटपर्यंत पोहोचला असेल, तर गोलंदाज नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाला धावबाद करू शकत नाही.
Web Title: Ben Stokes Suggestion On Not-Striker Leaving His Crease Early
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.