लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने गेल्या वर्षी एका नाईटक्लब बाहेर झालेल्या हाणामारीत दोन व्यक्तींना बेशुद्ध होईपर्यंत बदडले होते, असे वक्तव्य फिर्यादी पक्षाचे वकिल निकोलस कोर्सेलिन यांनी न्यायालयात केला आहे.
गेल्या वर्षी नाईटक्लबमध्ये झालेल्या हाणामारीनंतर स्टोक्सवर खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याची आज सुनावणी होती. या सुवानवणीच्या वेळी कोर्सेलिन यांनी स्टोक्सवर काही आरोप केले आहेत. पण या आरोप बिनबुडाचे असल्याचे स्टोक्सने म्हटले आहे. या खटल्याचा निकाल अजून लागलेला नाही. एका आठवड्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागू शकेल, असे म्हटले जात आहे.
कोर्सेलिन यांनी न्यायालयात सांगितले की, " ही सारी घटना रात्री दोननंतर घडली. या घटनेच्यावेळी स्टोक्सचा स्वत:वरचा ताबा सुटला होता. समोरच्या व्यक्तीला धोका पोहोचवण्याच्या दृष्टीनेच त्याने दोन व्यक्तींवर हल्ला केला. या दोघांना त्याने बेशुद्ध होईपर्यंत बदडले होते. "