Join us  

बेन स्टोंक्सचा विक्रम, कसोटीत २५०० धावा आणि १०० बळी घेणारा इंग्लंडचा तिसरा खेळाडू

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोंक्स याने कसोटीत दिनेश कार्तिकला बाद करत आपला १०० वा बळी साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 10:25 PM

Open in App

एजबस्टन, बर्मिंघम : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोंक्स याने कसोटीत दिनेश कार्तिकला बाद करत आपला १०० वा बळी साजरा केला. त्यासोबतच कसोटी २५०० धावा आणि १०० बळी घेणारा तो इंग्लंडचा तिसरा अष्टपैलू खेळाडू बनला. ही कामगिरी झटपट करणा-या खेळाडूंच्या यादीतही तो तिसराच आहे. त्याने ४३ कसोटीत ही कामगिरी केली.इंग्लंडकडून ही कामगिरी करण्याचा पहिला मान इयान बोथम यांच्याकडे आहे. त्यांनी कसोटीत ५२०० धावा आणि ३८३ बळी घेतले आहेत. तर स्टोंक्सचा संघ सहकारी स्टुअर्ट ब्रॉड याने २९७७ धावा आणि ४१७ बळी घेतले आहेत. अशी दुहेरी कामगिरी झटपट करणाºया खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी आहे तो बांगलादेशचा शाकिब अल हसन. शाकिबने फक्त ३७ कसोटीतच २५०० धावा आणि १०० बळींचा टप्पा ओलंडला होता. तर टोनी ग्रेग आणि गोड्डार्ड यांनी ४० व्या कसोटी ही कामगिरी केली होती. त्यासोबतच विंडिजचे सर गॅरी सोबर्स आणि आॅस्ट्रेलियाचे केथ मिलर यांनी ४८ व्या कसोटीत ही कामगिरी केली.भारताकडून ही कामगिरी करणारे तीन अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यात महान कपिल देव, संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा समावेश आहे. कुंबळे यांनी आपल्या कारकिर्दीत २५०६ धावा आणि ६१९ बळी घेतले आहेत. तर रवी शास्त्री यांनी ३८३० धावा आणि १५१ बळी घेतले. कपिल देव यांनी ५२४८ धावा आणि ४३४ बळी घेतले आहेत.

टॅग्स :बेन स्टोक्सक्रिकेट