Join us

चेंडू पकडण्यात बदल केल्याचा लाभ झाला - उमेश यादव

‘चेंडू पकडण्यात बदल केल्याने गोलंदाजीत भेदकता आली व आऊटस्विंग अधिक चांगला करण्यास मदत मिळाली,’ अशी प्रतिक्रिया गेल्या काही महिन्यांपासून शानदार फॉर्मात असलेला भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 05:01 IST

Open in App

कोलकाता : ‘चेंडू पकडण्यात बदल केल्याने गोलंदाजीत भेदकता आली व आऊटस्विंग अधिक चांगला करण्यास मदत मिळाली,’ अशी प्रतिक्रिया गेल्या काही महिन्यांपासून शानदार फॉर्मात असलेला भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केली. उमेशने भारताच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशविरुद्ध ८१ धावांत ८ बळी घेतले. भारताने रविवारी या लढतीत एक डाव ४६ धावांनी विजय मिळवला.बीसीसीआयसाठी सलामीवीर रोहित शर्माच्या प्रश्नाला उत्तर देताना उमेश म्हणाला, ‘चेंडू पकडण्याच्या पद्धतीत बदल केल्यामुळे मला फायदा झाला. सुरुवातीला माझी ग्रीप वेगळी होती. त्यामुळे एक-दोन चेंडू स्विंग होत होते, तर काही चेंडू डाव्या बाजूने सीमारेषेकडे जात होते. त्या पद्धतीत ग्रीपवर नियंत्रण राखणे कठीण होते. त्यानंतर मी प्रशिक्षकांसह चर्चा केली. त्यानंतर लक्षात आले की जर चेंडू योग्य पद्धतीने पकडला तर नियंत्रण राखण्याचे व स्विंग करण्याची चांगली संधी असते. त्यानंतर मी नियमितपणे आऊटसिंग गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरलो व काही चेंडू आतल्या बाजूमध्येही आणता आले.’

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध बांगलादेश