बेंगळुरू : कोरोना व्हायरसनंतर क्रिकेट सुरू होईल तेव्हा खेळाडू थोडे धास्तावलेले असतील. तरीही ते या ब्रेकचा सकारात्मक वापर करू शकतात, असे मत राष्टÑीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘ मी अनेक खेळाडूंना ब्रेकचा उपयोग शरीराला आणि डोक्याला आराम देण्यासाठी करा, असा सल्ला देतो. ही संधी पुन्हा मिळणार नाही. दोन-तीन महिन्यांचा योग्य वापर झाल्यास करिअर दोन किंवा तीन वर्षे वाढेल. खेळ सुरू नसला तरी खेळाडू कौशल्य विसरू शकत नाहीत. वेळेचा सदुपयोग केल्यास तुम्हाला क्रिकेटमध्ये परतण्यास वेळ लागणार नाही, हे एक क्रिकेटपटू या नात्याने सांगू शकतो.’ ‘मोठे सामने खेळण्याआधी खेळाडूंना फिटनेससाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. यामुळे आत्मविश्वासाचा संचार होईल. सामान्य फिटनेस आणि मॅच फिटनेस यात तफावत असते, ’असे द्रविडने स्पष्ट केले.
Web Title: Benefits if brakes are used properly - Rahul Dravid
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.