Best Catch Of Cricket History: क्रिकेटच्या मैदानावर अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतात... कधी प्रेक्षकांमधील एखादा उठून थेट मैदानात शिरतो, तर कधी खेळाडू चाहत्यांचे मनोरंजन करताना त्यांच्यात मिसळतात... कधी ठेका धरतात तर कधी खेळाडूंचा राग अनावर देखील होतो. पण, सध्या सोशल मीडियार व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण सीमारेषेकडे उलट्या दिशेने धावत खेळाडूने ज्या प्रकारे झेल घेतला अन् त्याला त्याच्या सहकाऱ्याची मिळालेली साथ पाहून सर्वजण या क्षेत्ररक्षकाचे कौतुक करत आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेलपैकी एक म्हणून याची नोंद केली जाईल.
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, फलंदाज मोठा फटका मारतो आणि चेंडू हवेत जातो... हळूहळू चेंडू सीमारेषेकडे कूच करत असतो. पण तितक्यात वर्तुळाजवळ उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे वेगाने धावत असतो. क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ धावत जातो अन् अप्रतिम झेल घेतो. या झेलची खास गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षक मागे लांबून पळत होता. यानंतर तो सीमारेषेला स्पर्श करणार तितक्यात चेंडू मैदानात असलेल्या दुसऱ्या खेळाडूच्या दिशेने फेकतो. मग जवळच उभा असलेला क्षेत्ररक्षक सहज झेल घेतो.
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल
क्षेत्ररक्षकाच्या या आश्चर्यकारक झेलनंतर फलंदाजासह चाहत्यांना धक्काच बसला. काहींना तर विश्वास देखील बसला नाही. पण खूप अवघड वाटणारा झेल घेऊन क्षेत्ररक्षकाने कमाल केली. अशाप्रकारे फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. मात्र, क्षेत्ररक्षकाने ज्या पद्धतीने मागे धावत झेल पकडला त्यावर फलंदाजाचाही विश्वास बसला नाही. पंचांनी बाद घोषित करताच खेळपट्टीवर असलेले दोन्हीही फलंदाज अवाक् झाले. सोशल मीडियावर या झेलचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वोत्तम झेल असल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.
Web Title: Best Catch Of Cricket History a video of the fielder running towards the boundary line and taking an amazing catch is going viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.