अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ झाला नाही

१९ वर्षांखालील विश्वचषक पटकावल्यानंतर भारताच्या युवा खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत असताना, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मात्र ‘अंतिम सामन्यात आमची कामगिरी सर्वोत्तम नव्हती,’ असे मत व्यक्त करुन सर्वांचे लक्ष वेधले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 03:41 AM2018-02-06T03:41:50+5:302018-02-06T03:43:34+5:30

whatsapp join usJoin us
The best game is not in the final match | अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ झाला नाही

अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळ झाला नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : १९ वर्षांखालील विश्वचषक पटकावल्यानंतर भारताच्या युवा खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत असताना, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मात्र ‘अंतिम सामन्यात आमची कामगिरी सर्वोत्तम नव्हती,’ असे मत व्यक्त करुन सर्वांचे लक्ष वेधले. सोमवारी दुपारी मुंबईत विश्वविजेत्या भारतीय युवा क्रिकेट संघात आगमन झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी द्रविड आणि पृथ्वीसेनेने संवाद साधला.
प्रशिक्षक द्रविड यांनी म्हटले की, ‘माझ्या मते अंतिम सामन्यात आम्ही आमचा अव्वल खेळ सादर केला नाही. याहून अधिक चांगली खेळी आम्हाला करता आली असती. परंतु, एकूणंच या अंतिम सामन्यासारख्या हायव्होल्टेज लढतीचा अनुभव युवा खेळाडूंना मिळणे खूप महत्त्वाचे होते.’ द्रविडने पुढे म्हटले की, ‘या स्पर्धेसाठी गेल्या १४-१५ महिन्यांपासून सर्वांनी मेहनत घेतली असून ही एक प्रक्रीया होती. युवा खेळाडूंना यातून मिळालेला अनुभव त्यांना आयुष्यभर कामी येईल. भविष्यात मोठमोठ्या स्पर्धा खेळताना त्यांना या अनुभवाचा फायदाच होणार आहे. मुंबई विमानतळावर झालेले स्वागत त्यांच्यासाठी एक अनोखा अनुभव होता आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचाही अनुभव मिळाला. यामुळे कारकिर्दीच्या सुरुवातीला असे विविध अनुभव युवांना मिळत आहे याचे समाधान मिलते. पण यापुढे त्यांच्यासमोर खरे आव्हान असून त्यासाठी त्यांना कठोर मेहनत घ्यायची आहे.’
संघबाधणीच्या प्रक्रीयेबाबत अधिक सांगताना द्रविड म्हणाला की, ‘संघ बांधणीचा प्रवास केवळ विश्वचषक स्पर्धेपुरता मर्यादित नव्हता, तर खेळाडूंची प्रगतीही अत्यंत महत्त्वाची होती. प्रत्येक खेळाडूने या प्रक्रीयेमध्ये स्वत:मध्ये सुधारणा करण्यासाठी मेहनत घेतली. प्रत्येकानेच गेल्या काही महिन्यांपासून अनेक गोष्टींचा त्याग केला होता. सर्व खेळाडूंनी ज्याप्रकारे सांघिक खेळ केला, ते अप्रतिम होते. दबावाच्या परिस्थितीमध्येही त्यांनी चांगला खेळ केला. हा एक महत्त्वाचा अनुभव सर्व युवा खेळाडूंना आता मिळाला आहे. शिवाय सपोर्ट स्टाफने जे योगदान दिले त्याचा खेळाडूंना मोठा फायदा झाला.’
त्याचप्रमाणे, ‘आताची पिढी खूप टेक्नोसॅव्ही असून त्यांची तुलना आमच्या पिढीसोबत होऊ शकत नाही. जेव्हा मी १९ वर्षांखालील क्रिकेट खेळलो, तेव्हा विश्वचषक नव्हते. त्यावेळी आम्ही भारतात न्यूझीलंडविरुद्ध एक मालिका खेळलो होतो. त्यावेळी फारसे क्रिकेट नव्हते. त्यावेळच्या तुलनेत आजचे क्रिकेट खूप बदलले आहे आत्ताचे खेळाडू खूप तंदुरुस्त असून ते अत्यंत आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळत आहेत. या सर्व गोष्टींचा मोठा फायदा भारतीय क्रिकेटला होईल,’ असेही द्रविडने यावेळी म्हटले.
>विरार ते मुंबईचा खडतर प्रवास....
१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ याने आपल्या यशाचे श्रेय वडिल पंकज शॉ यांना देताना म्हटले की, ‘संघाने विश्वचषक जिंकल्याचा मला खूप आनंद आहे. भारतासाठी खेळणे अभिमानास्पद आहे. पण माझ्यासाठी हा प्रवास खूप कठिण होता. मी विरार सारख्या लहान शहरातून जी यशस्वी मजल मारली त्याचे श्रेय माझ्या वडिलांना जाते. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले.
माझ्यासाठी त्यांनी नेहमी विरार ते मुंबईचा २-३ तासांचा लोकल टेÑनचा प्रवास केला. त्यांनी माझ्या सरावामध्ये आणि सामन्यांमध्ये कधीही खंड पडू दिला नाही. माझे वडिल माझ्यासाठी कधीही थांबले नाही.’ त्याचप्रमाणे, ‘जेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कठोर मेहनत घेता, तेव्हा त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळते. यशासाठी मेहनतीला पर्याय नाही,’ असा सल्लाही पृथ्वीने या वेळी नवोदित खेळाडूंना दिला.
>नक्की विश्वविजेते
कोण ठरले?
‘अंतिम सामन्याआधी आम्हाला २०१२ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना दाखविण्यात आला. त्या वेळी निकाल होता भारताने आॅस्टेÑलियाला नमवले. परंतु, आज सहा वर्षांनंतर त्या युवा संघातील केवळ एक किंवा दोन खेळाडू भारतीय संघातून खेळले, तर त्याच वेळच्या आॅसी संघातील ५-६ खेळाडू आॅस्टेÑलियाकडून खेळले. त्यामुळे नक्कीच विश्वविजेते कोण ठरले, हा एक वादाचा विषय ठरेल. त्यामुळे या युवा खेळाडूंना सांभाळणे व त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे मुख्य आव्हान असेल,’ असे प्रशिक्षक राहुल द्रविडने या वेळी म्हटले.
पाकिस्तानविरुद्ध विशेष रणनीती नव्हती...
स्पर्धेत क्रिकेटविश्वाचे लक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याकडे लागले होते. यासामन्याविषयी द्रविडने म्हटले की, ‘पाकिस्तानविरुद्ध विशेष रणनीती नव्हती. समोर कोणता संघ आहे त्याचा विचार केला नाही. प्रत्येक संघाविरुद्ध सारखीच रणनीती होती. पाकविरुद्ध वेगळी आणि बांगलादेशविरुद्ध वेगळी, अशी कोणतीही योजना नव्हती.

Web Title: The best game is not in the final match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.