मुंबई - मुंबईत पार पडलेल्या अखेच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघानं सरत्या वर्षाचा शेवट गोड केला. भारतीय संघाने 2017 या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 53 सामने खेळले असून यापैकी 37 सामन्यात विजय मिळवला तर 12 सामन्यात पराभवाचे तोंड पहावं लागलं. तर एकूण 4 सामन्याचा निकाल लागला नाही. 2017 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सुवर्णकाळ ठरला आहे. यावर्षी भारतीय संघाची विजयाची टक्केवारी 70 ऐवढी आहे. सांघिक खेळाच्या बळावर भारतानं यवर्षी जागतिक क्रिकेटध्ये नवा अध्याय लिहला. वर्षभरात झालेल्या 14 मालिकेमध्ये भारत अजिंक्य राहिला आहे. संघातील सर्वच खेळाडूनं आपल्या दर्जेनुसार खेळ केला. पण संघातील काही खेळाडूंची कामगिरी उल्लेखनिय ठरली. 2017 वर्ष त्यांनी गाजवलं. आज आपण अशाच टॉप पाच भारतीय क्रिकेटरच्या वर्षभरातील कामगिरींचा आढावा घेणार आहोत. ज्यांनी आपल्या उल्लेखनिय कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
विराट कोहली
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर वन-डे आणि टी-20मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षभारार विराट कोहलीनं खोऱ्यानं धावा काढल्या आहेत. वर्षभरात विराट कोहलीनं 11 शतक आणि दहा अर्धशतक झळकावली आहेत. यामध्ये तीन द्विशतकाचा समावेश आहे. तिन्ही प्रकारात विराट कोहलीनं 46 सामन्यात 2818 धावा केल्या आहेत. 10 कसोटीमध्ये 1059, 26 वन-डेत 1460 आणि दहा टी-20त 299 धावा केल्या आहे. कोहलीची सध्याची 50.53 ची सरासरी त्याच्या कौशल्याची साक्ष पटवते. पण कर्णधार बनल्यानंतरच्या 38 डावांमध्ये कोहलीची सरासरी आहे 65.50! आजवर कर्णधार म्हणून त्याच्यापेक्षा अधिक चांगली फलंदाजी साक्षात डॉन ब्रॅडमन (100.51) यांनाच देता आली आहे. म्हणजे नेतृत्व स्वीकारल्यानंतर कोहलीची धावांची आणि जिंकण्याची भूक वाढतेच आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराटने लंकेविरोधात मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत अप्रतिम प्रदर्शन केले. 3 कसोटींमध्ये तब्बल 610 धावांचा तडाखा देत त्याने दोन द्विशतके झळकावली. त्याचबरोबर कोहलीने आपल्या नेतृत्वामध्ये नवव्या मालिका विजयाचीही नोंद केली. एकूणच विराट भारताचा विजयी मंत्र ठरला आहे.
रोहित शर्मा
मोठ्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेल्या रोहितने दोन्ही हातांनी ही संधी साधत आपली छाप पाडली. त्याने तीन डावांत एक शतक व दोन अर्धशतके झळकावले. शिवाय, अनेक आकर्षक आणि क्रिकेटींग फटके खेळताना त्याने आगामी आफ्रिका दौ-यासाठी अंतिम अकरामध्ये स्वत:चे स्थान निश्चित केले आहे. 2017 मध्ये रोहित शर्मा 21 वन-डे सामने खेळला. यामध्ये त्यानं 1293 धावा काढताना सहा शतके आणि पाच अर्धशतकासह ठोकली. यामध्ये लंकेविरोधीत 208 धावांची खेळी अविस्मर्णिय होती. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितनं कर्णधारपदाचा भार संभाळला. कर्णधार झाल्यानंतर तो आधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. लंकेविरोधात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 35 चेंडूत शतक झळकावत हीटमॅननं आपला आक्रमकपणा दाखवून दिला. रोहित शर्मासाठी हे वर्ष लकी ठरलं आहे. त्याच्या क्रिकेट करियरमधील आतापर्यंतचे सर्वात यशस्वी वर्ष ठरलं आहे.
आर. अश्विन
अतिक्रिकेटमुळे भारतीय निवड समितीनं अश्विन, जाडेजा या दिग्गज जोडीला फक्त कसोटी संघात स्थान दिलं. 2017मध्ये अश्विननं 11 कसोटी सामने खेळले यामध्ये त्यानं 54 बळी घेतलेत. यावेळी 41 धावांच्या मोबदल्यात सहा बळी ही अश्विनची सर्वोत्कृष्ट कामिगिरी आहे. फलंदाजीमध्ये आश्विनने नाराजी केली, पण गोलंदाजीत तो अप्रतिम ठरला. त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो भारताचा किंबहुना जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. त्याने चतुराईने आणि आक्रमकतेने मारा केला. सर्वांत कमी कसोटी सामन्यात 300 बळींचा टप्पा पार केला. आगामी आफ्रिका दौऱ्यात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्व क्रिडाप्रेमीचं लक्ष लागले आहे. अश्विनला 2017 मध्ये फक्त नऊ वन-डे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. नऊ सामन्यात त्यानं फक्त आठ बळी मिळवले. यावर्षी खेळलेल्या एकमेव टी-20 सामन्यात त्याची पाटी कोरीच राहिली.
जसप्रित बुमराह
भुवनेश्वरच्या जोडीनं 2017 मध्ये बुमराहनं उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. 23 वन-डे मध्ये बुमराहनं 39 बळी घेतले आहेत. यावेळी 37 धावांवर पाच ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी राहिली आहे. 2017मध्ये खेळलेल्या दहा टी-20त बुमराहनं 12 बळी मिळवलेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराहला दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी कसोटी संघात पाचवा वेगवान गोलंदाज म्हणून भारताच्या १७ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. कामगिरीतील सातत्यामुळे त्याची आगामी आफ्रिका दौऱ्यात बुमराहची निवड म्हणजे 2017 मध्ये केलेल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले असे म्हटलं तर वावग वाटायला नको.
हार्दिक पांड्या
अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांडयानं 2017 हे वर्ष गाजवलं. त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतील कामगिरीमुळे त्याची तुलना महान क्रिकेटर कपिल देवशी केली जात आहे. जगातल्या कोणत्याही मैदानावर चौकार-षटकार मारण्याचे कौशल्या या युवा खेळाडूकडे आहे. मॅच फिनीशरच्या भुमेकित तो पुरेपुर उतरला आहे. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या मालिकेत हार्दिकनं सहजपणे ‘मालिकावीर’चा किताब पटकावला. त्याने कपिलदेवप्रमाणेच उत्तुंग षटकार ठोकले. काही वेळा त्याने गोलंदाजीची धुरा सांभाळावी. त्याच्याकडे ‘गोल्डन आर्म’ आहेत. मालिकेत त्याने सातत्याने बळीही मिळवले. सध्या तो सर्वाधिक गुणवान युवा खेळाडू आहे. हार्दिकनं यावर्षी कसोटी पदार्पण केलं. त्यानं तीन कसोटीतील चार डावांत फलंदाजी करताना 178 धावा काढल्या. यावेळी त्यानं एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं. तर गोलंदाजी चार बळी मिळवले. 2017 मध्ये हार्दिकनं 28 वन-डे सामने खेळले. यामध्ये त्यानं सहाशे धावा आणि 31 विकेट घेतल्या. नऊ टी-20मध्ये त्यानं 62 धावा आणि पाच बळी मिळवले. शेवटच्या काही षटकांमध्ये त्यानं उतकृष्ट फलंदाजी केली.
या क्रिकेटपट्टूंनीही गाजवलं वर्ष
चेतेश्वर पुजारा - 29 वर्षीय पुजारानं 2017 मध्ये 11 कसोटीत 67.05 च्या सरासरीनं 1140 धावा केल्या आहे. वर्षभरात सर्वाधिक कसोटी धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये तो प्रथम क्रमांकावर आहे. पुजाराकडे राहुल द्रवीडप्रमाणेच विश्वास ठेवला जातो. द्रवीडच्या जाण्यानं भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये झालेली पोकळी पुजरानं भरुन काढली. वर्षभरात पुजारानं चार शतकं आणि पाच अर्धशतक केली. यामध्ये रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळलेली त्याची 202 धावांची खेळी सर्वोच्च आहे. पुजारा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.
भुवनेश्वर कुमार -स्वीगंचा बादशाह भुवनेश्वर कुमारची 2017 ची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. तीन कसोटीत 2.67च्या सरासरीनं धावा देत त्यानं 11 बळी मिळवले. तर 24 वन-डेत त्यानं 28 बळी मिळवले.
रवींद्र जाडेजा - अष्टपैलू जाडेजानं 2017 मध्ये दहा कसोटीमधील 14 डावांत फलंदाजी करताना 328 धावा केल्या. तर गोलंदाजीत 20 बळी मिळवले.
मात्र 2018 वर्ष भारतासाठी तितकसं सोपं राहणार नाहीये. कारण या वर्षात भारताचे बहुतांश सामने हे परदेशी भुमीवर होणार आहेत. यातील 5 जानेवारीपासून भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे, आणि परदेशात भारतीय संघाची कामगिरी ही काही लपून राहिलेली नाहीये.
Web Title: # BestOf2017: These five cricketers have won the 2017 yea
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.