Join us  

#BestOF2017 : 'हिटमॅन' रोहित शर्मासाठी हे वर्ष ठरलं लकी

दुखापतीनंतर संघात पदार्पण करणाऱ्या मुंबईकर रोहित शर्मासाठी 2017 वर्ष खऱ्या अर्थानं लकी ठरलं आहे.

By namdeo.kumbhar | Published: December 28, 2017 8:58 AM

Open in App

मुंबई - दुखापतीनंतर संघात पदार्पण करणाऱ्या मुंबईकर रोहित शर्मासाठी 2017 वर्ष खऱ्या अर्थानं लकी ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला काहीशी अडखळत सुरुवात करणाऱ्या हिटमॅननं वन-डेत द्विशतक आणि टी-20त शतक ठोकत वर्षाखेरीस मात्र अख्या क्रिकेटविश्वात धुमाकुळ घातला. लग्नामुळं सुट्टीवर गेलेल्या नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितनं संघनायकाचा भार संभाळला. कर्णधार झाल्यानंतर तो आधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. लंकेविरोधात झालेल्या वन-डेत द्विशतक तर टी-20त 35 चेंडूत शतक झळकावत हिटमॅननं आपला आक्रमकपणा दाखवून दिला. रोहित शर्मासाठी हे वर्ष एखाद्या स्वप्नाप्रमाणं गेलं असं म्हटल्यास वावगं वाटायला नको. हिटमॅनच्या क्रिकेट करियरमधील आतापर्यंतचे 2017 हे सर्वात यशस्वी वर्ष ठरलं आहे.   

दुखापतीनंतर यशस्वी पुनरागमन मोठ्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेल्या रोहितने दोन्ही हातांनी ही संधी साधत आपली छाप पाडली. रोहितनं तीन डावांत एक शतक व दोन अर्धशतके झळकावली. शिवाय, अनेक आकर्षक आणि क्रिकेटींग फटके खेळताना त्याने आगामी आफ्रिका दौ-यासाठी अंतिम अकरामध्ये स्वत:चे स्थान निश्चित केले आहे. 2017 मध्ये रोहित शर्मा 21 वन-डे सामने खेळला. यामध्ये त्यानं 1293 धावा काढताना सहा शतके आणि पाच अर्धशतक ठोकली. यामध्ये लंकेविरोधीत 208 धावांची खेळी अविस्मर्णिय होती. 

कर्णधार म्हणून पदार्पण बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न बंधनात अडकण्यासाठी विराट कोहलीनं वर्षाखेरीस श्रीलंकेविराधातील वन-डे आणि कसोटी सामन्यात माघार घेतली त्यामुळे निवड समितीनं  उपकर्णधार रोहित शर्माकडे संघ नेतृत्वाची धुरा दिली. रोहितनं मिळालेल्या या संधीचा फायदा उचलतं विराट कोहलीला आपण पर्याय आहे हे दाखवून दिलं. लंकेविराधातील पहिल्याच वन-डे सामन्यात भारतीय फलंदाजी पुरती ढेपाळली. प्रेक्षकांनी विराटच्या अनुपस्थितीत भारतीय फंलदाजी टाकलेल्या नांगीवर कडाडून टीका केली. मात्र दुसऱ्याच वन-डेत राहितनं लंकेच्या फंलदाजाची धुलाई करत द्विशतकी खेळी केली. अन् लंकेशी हिशेब चुकता करत आपण ही कमी नसल्याचं सांगितलं. लंकेविरोधातील वन-डे मालिका भारतानं 2-1 अशा फरकानं जिंकली. वन-डे मालिकेनंतर रोहित अॅण्ड कंपनीनं लंकेचं दहनंच केलं. टी-20 मालिका 3-0 अशा फरकानं जिंकत रोहितनं आपण चांगला कर्णधार असल्याचे दाखवून दिलं. 

लेडी लक रोहितसाठी लकी रोहित शर्मानं आतापर्यंत केलेल्या सर्वच विक्रामांच्या वेळी त्याची लेडी लक उपस्थितीत होती. पत्नी रितीका मैदानात उपस्थित होती. रोहितने लंकेविरोधात शतक ठोकल्यानंतर इन्स्टाग्रामवर रितीकासोबतचा सेल्फी शेअर करत त्याती कबूलीही देऊन टाकली होती. 'हाच माझा लकी चार्म' अशी कॅप्शन त्याने फोटोला दिलं. रोहितने दुस-या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरोधात द्विशतक झळकावलं तेव्हादेखील रितीका मैदानात उपस्थित होती. माजी कर्णधार धोनीनंतर रोहितला ही लेडी लक चांगलचं लकी ठरलंय असे म्हणावं लागेल. 

गेल- धोनीपेक्षा मी वेगळा : रोहितमाझ्याकडे फटके मारण्यासाठी मोठी ताकद नाही, पण टायमिंग आहे. अचूक टायमिंगमध्येच फटके मारण्यास मदत होते. मैदान पाहून त्यानुसार मी खेळ करतो. मी ख्रिस गेलसारखा ‘पॉवर हिटर’ नसलो तरी अचूक टायमिंगच्या बळावर सहजपणे चौकार-षटकार ठोकू शकतो.

टी-20मधील सर्वात वेगवान शतक, मिलरशी बरोबरी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दोन शकते फटकावणारा रोहित शर्मा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. श्रीलंकेविरोधात दुस-या टी-20 सामन्यात रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करत 43 चेंडूत 118 धावा केल्या. फक्त 35 चेंडूत त्याने आपलं शतक पुर्ण केलं. 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या रोहितने पुढच्या 50 धावा अवघ्या 12 चेंडूत फटकावल्या. याबरोबरच टी-20 मधील सर्वात जलद शतक लगावण्याच्या दक्षिण अफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाची बरोबरी केली.  डेव्हिड मिलरने याचवर्षी 29 ऑक्टोबरला बांगलादेशविरोधात 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. डेव्हिड मिलरने या सामन्यात फक्त 35 चेंडूत शतक ठोकत आपल्या संघातील रिचर्ड लेव्हीचा जलद शतक ठोकण्याचा विक्रम मोडला होता. लेव्हीने 2012 मध्ये न्यूझीलंडविरोधात 45 चेंडूत शतक ठोकलं होतं.  

भारताकडून सर्वात जलद टी-20 शतक रोहित शर्मा टी-20 मध्ये भारताकडून सर्वात जलद शतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्यानं  35 चेंडूत शतक केलं. रोहितच्या आधी हा रेकॉर्ड लोकेश राहुलच्या नावे होता. लोकेश राहुलने गतवर्षी 27 ऑगस्टला वेस्टइंडिजविरोधात 46 चेंडूत शतक ठोकलं होतं.  याबरेबरच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक १० षटकार ठोकणारा फलंदाज, याआधी एका डावात सर्वाधिक ७ षटकार युवराज सिंगने फटकावले . 

वर्षभरात सर्वाधिक षटकार रोहित शर्मानं यावर्षी षटकारांचा रतीब लावला. त्यानं यावर्षी एकट्या लंकेविरोधात 37 षटकारांची बरसात केली. रोहितनं 2017 मध्ये 65 षटकार ठोकतं अनेखा विक्रम आपल्या नावं केला. यावेळी त्यानं गेल, आफ्रिदी, डिव्हीलर्ससह अन्य क्रिकेटपट्टूंचे विक्रम मोडले. आयसीसी क्रमवारी: रोहित शर्मा पाचव्या स्थानी रोहित शर्मा आयसीसी वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कारकिर्दीत तिस-यांदा द्विशतकी खेळी करणा-या रोहितने सातव्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर उडी घेतली. रोहितने यापूर्वी फेब्रुवारी २०१६ मध्ये मानांकनात तिसरे स्थान पटकावले होते. 

लग्नाच्या वाढदिवसालाच ठोकलं द्विशतक, बायकोला अनोखं गिफ्ट कर्णधारपदाच्या दुस-याच सामन्यात रोहित शर्माने द्विशतक ठोकलं. फक्त 153 चेंडूत रोहितने 208 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 13 चौकार आणि 12 षटकार ठोकले. महत्वाचं म्हणजेच त्याच दिवशी रोहित शर्माच्या लग्नाचा वाढदिवस होता. मोहालीतील सामन्याला पत्नी रितिका उपस्थित होती. द्विशतक लगावत रोहित शर्मा पत्नी रितिकाला लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे. 13 डिसेंबर 2015 ला रोहित शर्मा गर्लफ्रेंण्ड रितिकासोबत लग्न बंधनात अडकला होता. रोहितने शतक ठोकल्यानंतर पत्नी रितिकाला फ्लाईंग किस दिला. यावेळी रितिकालाही अश्रू अनावर झाले होते. 

तीन द्विशतक ठोकणारा पहिलाच खेळाडूलंकेविरोधात तिसऱ्या सामन्यात द्विशतकी खेळी करत लंकेच्या फलंदाजांची पिसे काढणाऱ्या रोहितनं आपल्या नावे हा खास पराक्रम केला आहे. लंकेविरोधात शर्माने 153 चेंडूत नाबाद 208 धावा केल्या. यामध्ये त्याने 13 चौकार आणि 12 षटकार ठोकले. याबरोबरच एकदिवसीय सामन्यात तीन द्विशतक ठोकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. रोहित शर्माने पहिलं द्विशतक 2 नोव्हेंबर 2013 रोजी बंगळुरुत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत ठोकलं होतं. या सामन्यात रोहितनं 158 चेंडूत 209 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने दुसरं द्विशतक 16 नोव्हेंबर 2014 रोजी कोलकातामधील ईडन गार्डन मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या वनडे ठोकलं होतं. या सामन्यात त्याने 225 चेंडूत 264 धावा केल्या होत्या. 

कांगारुंविरोधात असा पराक्रम करणारा रोहित जगातील पहिलाच खेळाडूकांगारुंविरोधात बंगळुरुत झालेल्या सामन्यात रोहितनं  55 चेंडूत 65 धावांची खेळी केली.  या खेळीदरम्यान त्यानं 5 उतुंग षटकार लगावले. दुसरा षटकार लगावतात ऑस्ट्रेलियाविरोधात वन-डेत त्यानं षटकारांच अर्धशतक पुर्ण केलं. सिक्सर लगावण्याची बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावण्यात रोहित शर्मा सर्वात पुढे आहे. रोहितने ऑस्ट्रेलिया विरूद्ध 43 आंतरराष्ट्रीय सामन्यात 70 सिक्सर लगावले आहेत. वन-डेत रोहितनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वात जास्त सिक्सर लगावणारा दुसरा खेळाडू इंग्लंडचा इयॉन मोर्गन आहे. त्याने आतापर्यंत 43सामन्यामध्ये 39 षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक सिक्सर लगावणा-या दुसरा भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरूद्ध 71 वनडे सामन्यांमध्ये 35 षटकार लगावले आहेत.

परिस्थितीवर मात करत माणूस गगनभरारी कशी घेऊ शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे रोहित. त्याचा उल्लेख नेहमीच असामान्य गुणवत्तेचा पण सातत्य न राखणारा फलंदाज म्हणून केला जातो. रोहितच्या फॅन्सनाच काय, भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनाच काय पण अस्सल फलंदाजीचा शौकीन असणाऱ्या कुणालाही त्यामुळे दुःख होते. मागील दोन वर्षांपासून ही इमेज सुधारण्याचा रोहित प्रयत्न करतोय. विशेषतः पाच महिन्यांच्या इंज्युरीमुळे सक्तीच्या विश्रांतीनंतर परतल्यावर तर तो अधिक सातत्याने खेळ खेळतोय. रोहितच्या बाबतीत ‘देर आए, पर दुरुस्त आए’ असं म्हणता येईल. पाहूयात 2018 मध्ये हिटमॅन कसा खेळतो, कारण आता भारताचे आधिकाधिक सामनं बाहेरदेशात आहेत. 

टॅग्स :रोहित शर्माक्रिकेटबेस्ट ऑफ 2017