भारतात क्रिकेटपटूंना मैदानावरील कामगिरीबद्दल भरभरून प्रेम मिळते. पण सोशल मीडियावर त्यांना तितक्याच प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. याचा सामना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही करावा लागतो.. खेळाडूची एक खराब कामगिरी आणि ट्रोलर्स गिधाडासारखे त्याच्यावर सोशल मीडियावर तुटून पडतात... जसप्रीत बुमराह, विराट कोहली, रोहित शर्मा या आघाडीच्या क्रिकेटपटूंनाही याचा सामना करावा लागला आहे. नुकतेच एका ट्रोलर्सने जसप्रीतची पत्नी संजना गणेशन ( Sanjana Ganesan ) हिला बॉडी शेमचा सामना करावा लागला.
जसप्रीत बुमराहने सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक प्रमोशनल व्हिडिओ पोस्ट केला, जो एका ब्रँडची जाहिरात आहे आणि त्यात त्याची पत्नी संजना देखील यामध्ये आहे. त्यावर ट्रोलर्सनी तिच्यावर कमेंट केली. संजना आणि जसप्रीत नुकतेच आई-बाबा झाले आहेत. जसप्रीतच्या व्हिडिओवर एकाने कमेंट केली की ''भाभी मोटी लग रही है''... अशा अनेक कमेंट होता. त्यावर संजनाने सडेतोड उत्तर दिले. तिने लिहिले की, तुम्ही तुमच्या शाळेतील विज्ञानाच्या पुस्तकांतूनही काही शिकू शकत नाही आणि इथे तुम्ही स्त्रियांच्या शरीराबद्दलचे ज्ञान दाखवण्यासाठी आला आहात. पळ इथून... ( स्कूल की विज्ञान पाठ्यपुस्तक तो याद होती नहीं है तुमसे, औरतों के शरीर के बारे में खराब टिप्पणी कर रहे हो. भागो यहा से).
संजना एक यशस्वी स्पोर्ट्स ब्रॉडकास्टर आहे. ती इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ची डिजिटल प्रेझेंटर आहे आणि तिने स्टार स्पोर्ट्ससह अनेक क्रिकेट वर्ल्ड कप कव्हर केले आहेत. ती मिस इंडिया २०१४ मध्ये अंतिम फेरीत सहभागी झाली होती आणि तिने रिॲलिटी टीव्ही शो स्प्लिट्सविलामध्ये भाग घेतला होता. अनुष्का शर्मा (विराट कोहलीची पत्नी), रितिका सजदेह (रोहित शर्माची जोडीदार) या देखील क्रिकेट WAG मध्ये आहेत ज्यांना नियमितपणे ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.