भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच सामन्यांच्या मालिकेनंतर तो फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे. एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी आधी तो इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसह रणजी सामन्यात खेळणार का? अशी चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला त्याचा फिल्ड बाहेरील एक खास व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत किंग कोहलीभोवती चाहत्यांनी गराडा घातल्याचे दिसून येते. यावेळ स्टार क्रिकेटरनं दिलेली रिअॅक्शन अधिक चर्चेचा विषय ठरतीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोहलीच्या कमेंटमुळे व्हिडिओ आला चर्चेत
विराट कोहली काही दिवसांपूर्वी पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत अलिबाग दौऱ्यावर गेल्याचे पाहायला मिळाले होते. कोहली अन् त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या भटकंतीची चांगलीच चर्चा रंगली. होती. त्यातील एक खास व्हिडिओ विराट कोहलीच्या कमेंटमुळे लक्षवेधून घेतो. कोहलीला पाहिल्यावर लोक सेल्फी घेण्यासाठी त्याच्याभोवती गर्दी करताना दिसतात. या व्हिडिओमध्ये कोहली गर्दी करून आपल्या रस्त्यात आलेल्या मंडळींना ''भाई मेरा रास्ता मत रोको।'' असे म्हणताना दिसते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक शतक अन् ...
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहलीनं एक शतक झळकावले. पण त्यानंतर त्याच्याकडून अपेक्षित खेळी पाहायला मिळाली नाही. विशेष म्हणजे सातत्याने तो बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आउट होताना दिसले. एकाच पॅटर्नमध्ये विकेट फेकल्यामुळे तो ट्रोलही झाला. काहींनी तरी या स्टार बॅटरला निवृत्तीचा सल्लाही दिला.
किंग कोहली व्हाइट बॉलमध्ये दमदार कामगिरीसह ट्रोलर्सची बोलती बंद करणार?
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. विराट कोहली या मालिकेत खेळणा की, थेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतच मैदानात उतरणार ते पाहण्याजोगे असेल. गत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. पण २०१७ मध्ये त्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवासह ऑस्ट्रेलियातील कमी भरून काढण्यासाठी तो मैदानात उतरेल. त्यात तो यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Bhai Mera rasta mat Roko Virat Kohli Reaction After Fans Gathers To Watch Cricketer And Wife Anushka During Visit To Alibaug
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.