नवी दिल्ली : आपल्याकडे असलेल्या अफाट गुणवत्तेचा आपल्या देशातील युवा खेळाडूंना फायदा व्हावा, असा विचार काही मना खेळाडू करतात. हे महान खेळाडू खेळाडूंना मार्गदर्शन करतात, त्यांच्यासाठी अकादमी उघडतात. भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही क्रिकेटची एक अकादमी उभारली आहे, पण अकादमी त्याने उघडली आहे ती भारताबाहेर.
इंग्लंडमधील मिडिलसेक्स क्लबबरोबर सचिनचा करार झाला आहे. या अकादमीमध्ये 9 ते 14 या वयोगटातील मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ' तेंडुलकर मिडिलसेक्स ग्लोबल अकादमी ' या नावाने ही अकादमी सुरु होणार आहे. या अकादमीसाठी सचिनने खास ट्रेनिंग कार्यक्रमही बनवला आहे.
या अकादमीबाबत सचिन म्हणाला की, " चांगले क्रिकेटपटू तयार व्हावेत, हेच फक्त माझं लक्ष्य नाही. चांगला क्रिकेटपटू होण्यापूर्वी चांगला नागरिक होणं महत्त्वाचं आहे. या अकादमीमध्ये आम्ही सर्वोत्तम प्रशिक्षण देणार आहोत. "