कोलकाता : वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. गुरुवारी रात्री भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली. कर्णधार विराट कोहलीला सलग दोन टी२० मालिकेत विश्रांती दिल्यानंतर विंडीजविरुद्धच्या टी२० मालिकेत निवडले असून रोहित शर्माने विश्रांती न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या खराब फॉर्मशी झगडत असलेल्या शिखर धवनने स्थान कायम राखले आहे. बांगलादेशविरुद्ध टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या युवा शिवम दुबेला एकदिवसीय संघातही स्थान मिळाले. तसेच, खलील अहमदऐवजी मोहम्मद शमीला टी२० संघात निवडले आहे.
कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांचेही टी२० संघात पुनरागमन झाले असून कृणाल पांड्याला संघाबाहेर गेला आहे. विंडीज दौऱ्यानंतर आॅगस्ट महिन्यापासून भुवनेश्वर दुखापतीमुळे संघाबाहेर होता. दरम्यान, या मालिकेत महेंद्रसिंग धोनी व मयांक अगरवाल यांना संधी मिळेल अशी शक्यता होती. मात्र दोघांचीही निवड झालेली नाही. महाराष्ट्राचा केदार जाधव पुन्हा संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला.
Web Title: Bhubaneswar Kumar's team returns to India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.