कोलकाता - पाहुण्या श्रीलंकेने पहिल्या डावात 122 धावांची तगडी आघाडी घेतल्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुल या सलामीवीरांनी कोलकाता कसोटी भारताला पुनरागमन करून दिले आहे. 94 धावा कुटणारा शिखर धवन आणि नाबाद 71 धावांची खेळी करणारा लोकेश राहुल यांनी दिलेल्या 166 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने चौथ्या दिवसअखेर 1 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली आहे. मात्र धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या शिखर धवनचे शतक हुकल्याने ईडन गार्डनवर उपस्थित असलेल्या मोजक्या क्रिकेटप्रेमींना चुटपूट लागली होती. भारताकडे आता 49 धावांची आघाडी असल्यामुळे शेवटच्या दिवशी चुरशीचा खेळ होण्याची शक्यता आहे. पहिल्या डावात 122 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी जोरदार फलंदाजी करत भारताच्या आव्हानात जान आणली. तत्पूर्वी भारताच्या 172 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने सामन्यात आपलं वर्चस्व कायम राखत पहिल्या डावात 122 धावांची आघाडी मिळवली होती. श्रीलंकेचा डाव 294धावांवर आटोपला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी चार बळी मिळवले. तर उमेश यादवने दोन फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला. या सामन्यात भारताच्या फिरकीपटूंच्या बळींची पाटी कोरीच राहिली.
कालच्या चार बाद 165 धावसंखेवरुन लंकेनं आपला खेळ सुरुवात केला. पण भुवनेश्वर आणि शमीनं सुरुवातीलाचा लंकेला धक्के दिलं. पण लंकेकडून शेवटच्या फळीत रंगना हेरथने केलेल्या 67 धावांच्या जोरावर श्रीलंकेने 294 धावांपर्यंत मजल मारली. रंगनाने भारतीय गोलंदाजी फोडून काढत अर्धशतकी खेळी केली. पाऊस आणि अंधुक सूर्यप्रकाश यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 1 बाद 171 धावा झाल्या होत्या. भारताकडे आता दुसऱ्या डावामध्ये 49 धावांची आघाडी आहे.
दरम्यान, त्यापूर्वी तिसऱ्या दिवशी लाहिरू थिरिमाने व अँजेलो मॅथ्यूज यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावताना तिस-या विकेटसाठी केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेने भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिस-या दिवसअखेर पहिल्या डावात ४ बाद १६५ धावांची मजल मारत वर्चस्व राखले. वर्षभरापेक्षा अधिक कालावधीनंतर संघात पुनरागमन करणा-या थिरिमानेने वैयक्तिक २७ धावांवर शिखर धवनतर्फे मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर लाभ घेत ५१ धावांची खेळी केली आणि मॅथ्यूजसोबत (५२) तिसºया विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. या दोघांनी प्रत्येकी ९४ चेंडू खेळताना प्रत्येकी ८ चौकार लगावले. अंधूक प्रकाशामुळे आज तिसºया दिवसाचा खेळ निर्धारित वेळेपूर्वीच थांबविण्यात आला त्या वेळी निरोशन डिकवेला (१४) व कर्णधार दिनेश चांदीमल (१३) खेळपट्टीवर होते. भुवनेश्वर कुमार (२-४९) व उमेश यादव (२-५०) यांनी भारताला पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केला, पण तरी श्रीलंकेला मजबूत स्थितीमध्ये पोहोचण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले.
त्याआधी, तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात श्रीलंकेने सुरंगा लकमलच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत भारताला १७२ धावांत गुंडाळले. श्रीलंका संघ पहिल्या डावात केवळ ७ धावांनी पिछाडीवर असून, त्यांच्या सहा विकेट शिल्लक आहेत. पहिले दोन दिवस खराब वातावरणामुळे केवळ ३२.२ षटकांचा खेळ शक्यझाला, पण आज सूर्यप्रकाश असल्यामुळे ७२.२ षटके टाकल्या गेली. भुवनेश्वरने दिमुथ करुणारत्ने (८) व सदिरा समरविक्रम (२३) यांना माघारी परतवले, तर उमेशने अॅन्जेलो मॅथ्यूज (५२) व लाहिरू थिरिमाने (५१) यांना तंबूचा मार्ग दाखवला.