Bhuvneshwar Kumar, IPL 2022 : यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादने (SRH) आपला सहावा विजय मिळवला. मुंबई इंडियन्सविरूद्ध (Mumbai Indians) थरारक विजय मिळवणारा हैदराबादचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत अजूनही कायम आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा ३ धावांनी पराभव केला. हा सामना अगदी अटीतटीचा झाला. त्यात हैदराबादने बाजी मारली. या विजयात अनुभवी वेगवान गोलंदाज भुनेश्वर कुमारने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने यॉर्करच्या जोरावर सामन्यात संघाला विजय मिळवून दिला.
१९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाने १८ षटकांत ६ गडी गमावून १७५ धावा केल्या. तेथून संघाला विजयासाठी १२ चेंडूत १९ धावांची गरज होती. अशा स्थितीत विल्यमसनने भुवनेश्वरला ओव्हर दिली. त्याने दुसऱ्या चेंडूवर संजय यादवला बाद केले. यानंतर जसप्रीत बुमराहने अचूक यॉर्कर टाकताना षटकात एकही धाव दिली नाही. ती मेडन ओव्हर होती. अशा स्थितीत मुंबईला शेवटच्या षटकात १९ धावांची गरज होती, ज्यात त्यांनी १५ धावा केल्या. त्यामुळे मुंबईला सामना गमवावा लागला. त्यासोबतच त्याने एका मोठा पराक्रम केला.
भुवनेश्वर कुमारने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. IPL च्या इतिहासात ११वी मेडन ओव्हर टाकत तो यादीतील दुसरा गोलंदाज ठरला. या यादीत त्याने माजी क्रिकेटपटू इरफान पठाणला मागे टाकले. सध्या IPL मध्ये सर्वाधिक १४ मेडन ओव्हर टाकणारा प्रवीण कुमार यादीत अव्वल स्थानावर आहे.
प्रवीण कुमार - १४ मेडन
भुवनेश्वर कुमार - ११ मेडन
इरफान पठाण - १० मेडन
जसप्रीत बुमराह - ८ मेडन
धवल कुलकर्णी - ८ मेडन
Web Title: Bhuvneshwar Kumar New Record in IPL 2022 Most Maiden Overs MI vs SRH overtakes Star Indian bowler Irfan Pathan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.