- सुनील गावसकर
ब्रेबॉर्न स्टेडियमवर शानदार कामगिरी करीत भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी मिळविली. काही झेल सोडले नसते तर आणखी मोठा विजय साकार झाला असता. नेहमी धावांचा डोंगर उभारणारा कोहली अपयशी ठरला तरी संघाने धावडोंगर उभारलाच. क्रिकेट हा केवळ चेंडू आणि बॅट यांच्यातील संघर्ष नाही, यात गोलंदाज आणि फलंदाजाची खरी कसोटी असते. फलंदाज गोलंदाजाच्या मानसिकतेवर हावी होण्याचा प्रयत्न करतो तर गोलंदाज देखील फलंदाजाची उणीव शोधण्याच्या प्रयत्नात असतो.
पुण्यात जेसन होल्डरच्या चेंडूवर त्रिफळा बाद झालेला रोहित चौथ्या सामन्यात त्याला फटके मारताना दिसला. होल्डरच्या आखूड टप्प्याच्या चेंडूंना थेट सीमेपलिकडे पाठविण्याचे काम रोहितने यशस्वीपणे केले. रोहितची आक्रमक खेळी पाहण्यासारखी होती. पाहतापाहता त्याने शतक गाठले. कोहलीविरुद्ध ही विंडीजच्या गोलंदाजांनी आखूड टप्प्याच्या चेंडूचे डावपेच आखले होते. यामुळे बॅटच्या कोपऱ्याला चाटून चेंडू डीप फाईन लेगवर असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात स्थिरावला होता.
अंबाती रायुडू यानेही शानदार शतकी खेळी करीत संघातील स्थान भक्कम केले. संघात पुनरागमन करणे सोपे नसते पण अंबातीने योग्यवेळी चमक दाखवित हे करून दाखविले. युवा गोलंदाज खलील अहमद याने देखील पांढºया चेंडूंना यशस्वीपणे स्विंग केले. त्याचे अनुभवी सॅम्युअल्सला जाळ्यात ओढणे कौतुकास्पद होते. सॅम्युअल्सला त्याने सातत्याने आत येणारे चेंडू टाकले. दरम्यान अचानक एक चेंडू बाहेर जाणारा टाकताच सॅम्युअल्सच्या बॅटच्या वरच्या कोपºयाचा वेध घेत चेंडू स्लिपमध्ये रोहितच्या हातात स्थिरावला होता. स्लिपमध्ये असे झेल टिपण्यात रोहित पटाईत आहे.
भारतासाठी सध्या एकमेव चिंतेची बाब अशी की भुवनेश्वर कुमार फॉर्ममध्ये नाही. त्याची ढेपाळलेली गोलंदाजी चिंतेचा विषय आहे. स्वाभाविक चेंडू टाकताना तो दिसत नाही. त्याच्या चेंडूत जितका भेदकपणा जाणवेल तितका तो आॅस्ट्रेलिया दौºयात प्रभावी सिद्ध होणार आहे. विंडीजला इभ्रत शाबुत ठेवण्यासाठी अखेरचा वन डे जिंकावाच लागेल. पण ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये पाहुण्या संघाची देहबोली पाहून ते दौºयात जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नसल्याची खात्री पटली. तरीही अखेरच्या सामन्यात विशाखापट्टणम आणि पुण्यातील कामगिरीची पुनरावृत्ती होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. (पीएमजी)
Web Title: Bhuvneshwar Kumar's 'form' raised concerns about the Indian team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.