Join us  

Virat Kohli Video: विराट कोहली हॉटेल रुमप्रकरणी मोठी कारवाई; कॉन्ट्रॅक्टरला हटविले

विराट कोहलीच्या रुममध्ये एक फॅन घुसला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे संतापलेल्या कोहलीने प्रायव्हसीचा मुद्दा उचलून धरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 3:30 PM

Open in App

ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू असताना विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याच्या हॉटेलमधील खोलीत घुसून व्हिडीओ रेकॉर्ड केल्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पर्थमथधील  हॉटेल प्रशासनाने सपशेल माफी मागत कॉन्ट्रॅक्टरवर मोठी कारवाई केली आहे. त्याला काढून टाकण्यात आले आहे. 

हॉटेलच्या प्रवक्त्याने अशा प्रकरणांबाबत यापुढे जागरुक राहणार असल्याचे म्हटले आहे. विराट कोहलीच्या रुममध्ये एक फॅन घुसला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे संतापलेल्या कोहलीने प्रायव्हसीचा मुद्दा उचलून धरला आहे. आता या प्रकरणावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विराटच्या या चाहत्याने हॉटेलमधील त्याच्या खोलीत जाऊन व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. यासोबतच या चाहत्याने किंग कोहलीची हॉटेलची खोली असे कॅप्शनही दिले आहे. यावर क्रिकेट आणि सिनेजगतातील सेलिब्रिटींच्या टीकात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. 

 “आपल्या आवडत्या खेळाडूला पाहून चाहते खूश होतात हे मी समजतो. मी कायमचं याचं कौतुक करतो. परंतु हा व्हिडीओ घाबरवणारा आहे आणि मी माझ्या प्रायव्हसीबाबत चिंतीत आहे. जर मला माझ्या हॉटेलच्या रूममध्ये प्रायव्हसी मिळत नसेल तर पर्सनल स्पेसची मी कुठे अपेक्षा करू शकतो. अशा प्रकारच्या गोष्टींशी मी सहमत नाही. लोकांच्या प्रायव्हसीचा सन्मान करा आणि त्यांना आपल्या मनोरंजनाचं साधन समजू नका,” असे विराट म्हणाला होता. तसेच बीसीसीआयकडे याची तक्रार केली होती. 

यापूर्वीही झाला होता वादटी20 विश्वचषक स्पर्धेत ही पहिलीच वेळ नाही जेव्हा कोहली किंवा टीम इंडिया वादात सापडली नाही. सिडनीमध्ये भारतीय संघाला खाण्यासाठी थंड सँडव्हिच देण्यात आलं होतं. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक खेळाडूंनी ते खाण्यास नकार दिला होता. यानंतर मोठा वाद झाला होता आणि आयसीसीलाही स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. आता विराटच्या रुममध्ये फॅन शिरल्याची घटना घटली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :विराट कोहलीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२आॅस्ट्रेलिया
Open in App