Join us  

मोठी बातमी : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूची इंग्लंड दौऱ्यातून माघार; शुबमन गिल, आवेश खान यांच्यानंतर आणखी एक धक्का

India tour of England : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 2:49 PM

Open in App
ठळक मुद्देशुबमन गिलप्रमाणे बीसीसीआयला या दोन्ही खेळाडूंची रिप्लेसमेंट करता येणार नाही.

India tour of England : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. दुखापतीमुळे शुबमन गिल ( Shubman Gill) दोन दिवसांपूर्वीय मायदेशी परतला आहे. त्यात सराव सामन्यात राखीव गोलंदाज आवेश खान याच्याही बोटाला दुखापत झाली आणि त्याची मालिकेतून माघार ही निश्चित आहे. त्यात आणखी एक नाव जमा झाले आहे आणि भारतासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल. ज्या खेळाडूच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया दौरा गाजला त्यालाच दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागत आहे.

India Tour of England : 2016साली टीम इंडियाची झोप उडवणारा फलंदाज परतला; कोण आहे हसीब हमीद व त्याचे गुजरात कनेक्शन?

भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडू 20 दिवसांच्या सुट्टीवर होते आणि दरम्यान रिषभ पंतला कोरोना झाला. भारताचा यष्टिरक्षक आता पूर्णपणे बरा झाला असून भारताच्या कॅम्पमध्ये गुरुवारी दाखल झाला आहे. तेच दुसरीकडे अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar) याला दुखापत झाली आहे आणि त्यानेही इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतली आहे. आवेश प्रमाणेच वॉशिंग्टनच्या बोटाला दुखापत झाली आहे. वॉशिंग्टनच्या दुखापतीची माहीत अद्याप बीसीसीआयनं जाहीर केलेली नाही. पण, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार वॉशिंग्टनही इंग्लंड मालिकेला मुकणार आहे. ( Washington Sundar has been ruled out of the Test series against England) 

वॉशिंग्टन आणि आवेश या दोघांनी सराव सामन्यात कौंटी एकादश संघाचे प्रतिनिधित्व केलं, आवेशला पहिल्याच दिवशी दुखापत झाली आणि त्यानं मैदान सोडले. त्यानंतर बीसीसीआयनं ट्विट करून आवेश उर्वरित दोन्ही दिवशी खेळणार नसल्याचे अपडेट्स दिले. सूत्रांच्या माहितीनुसार आवेशला 8 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. त्यात वॉशिंग्टनच्या दुखापतीनं टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. गिलप्रमाणे बीसीसीआयला या दोन्ही खेळाडूंची रिप्लेसमेंट करता येणार नाही.

भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला

इंग्लंडचा संघ ( England Men’s Test Squad) - जो रूट ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॅवली, सॅम कुरन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, मार्क वूड 

इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज१२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स२५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले२ ते ६ सप्टेंबर - ओव्हल१० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडवॉशिंग्टन सुंदरशुभमन गिलबीसीसीआय