ठळक मुद्देस्टोक्स जर पूर्णपणे फिट नसला तर त्याच्या जागी संघात ख्रिस वोक्सला संधी देण्यात येऊ शकते.
लंडन : इंग्लंडच्या क्रिकेट संघाला बेन स्टोक्सच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी सराव करत असताना स्टोक्सला दुखापत झाली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टोक्स खेळणार की नाही, याबाबत संदिग्धता व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 9 विकेट्स राखऊन दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्याच्या पहिल्या डावात स्टोक्सने 38 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर पाकिस्तानच्या तीन फलंदाजांनाही स्टोक्सने तंबूचा रस्ता दाखवला होता. पहिल्या सामन्यात स्टोक्सकडून चांगली अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली होती. त्यामुळे जर दुसऱ्या सामन्यात स्टोक्स खेळणार नसेल तर इंग्लंडसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी क्षेत्ररक्षणाचा सराव करत असताना स्टोक्सला दुखापत झाली. सध्याच्या घडीला स्टोक्सवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. इंग्लंड संघाची मेडिकल टीम सध्या स्टोक्सच्या दुखापतीवर उपचार करत आहे. शुक्रवारी सामन्याच्या पूर्वी स्टोक्सच्या काही चाचण्या घेतल्या जातील. या चाचण्यांमध्ये स्टोक्स जर फिट असल्याचे वाटले तरच त्याला संघात स्थान देण्यात येईल. स्टोक्स जर पूर्णपणे फिट नसला तर त्याच्या जागी संघात ख्रिस वोक्सला संधी देण्यात येऊ शकते. वोक्स हा पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघात बारावा खेळाडू होता.
Web Title: BIG blow for England... Ben Stokes suffered injuries
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.