मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; जसप्रीत बुमराहपाठोपाठ आणखी एक जलदगती गोलंदाज IPL 2023 मधून OUT!

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) डोकेदुखी वाढताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 02:48 PM2023-03-11T14:48:53+5:302023-03-11T14:49:16+5:30

whatsapp join usJoin us
Big blow for Mumbai Indians, After Jasprit Bumrah Jhye Richardson out of IPL 2023, likely to miss Ashes too | मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; जसप्रीत बुमराहपाठोपाठ आणखी एक जलदगती गोलंदाज IPL 2023 मधून OUT!

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; जसप्रीत बुमराहपाठोपाठ आणखी एक जलदगती गोलंदाज IPL 2023 मधून OUT!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) डोकेदुखी वाढताना दिसत आहे. मागच्या पर्वात जोफ्रा आर्चर नसल्याने MI चे पाहते नाराज होते, परंतु यंदा आर्चर खेळणार असताना जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. अशात आता आर्चर-बुमराह या जोडीला एकत्र खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. बुमराहच्या गैरहजेरीत आर्चरसोबत झाय रिचर्डसन ( Jhye Richardson) हा मुंबई इंडियन्सला आधार देईल असे वाटते होते, परंतु त्यानेही आयपीएल २०२३मधून माघार घेतली आहे. मागील आठवड्यात क्लब क्रिकेट खेळताना त्याला दुखापत झाली. त्याने भारताविरुद्धच्या वन डे मालिकेतूनही माघार घेतली. आता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

''दुखापत हा क्रिकेटचाच भाग आहे आणि हे सत्य आहे. हे खूप संतापजनक आहे, परंतु दोन पाऊलं पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे जात आहे,''असे त्याने ट्विट केले. 
 


२०१९मध्येही खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्याने त्याला वन डे वर्ल्ड कप व अॅशेस मालिकेला मुकावे लागले होते. डिसेंबर २०२१मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध एडिलेड कसोटीत पाच विकेट्स घेतल्या होत्या. खांद्यावरील शस्त्रक्रियेनंतर ही त्याची पहिलीच कसोटी होती. पण, पुढच्या सामन्यात दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागले. जून २०२२ मध्ये त्याने श्रीलंका दौऱ्यावर एक ट्वेंटी-२० व एक वन डे सामना खेळला.   

मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड, डेवॉल्ड ब्रेव्हिस, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, राघव गोयल

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Big blow for Mumbai Indians, After Jasprit Bumrah Jhye Richardson out of IPL 2023, likely to miss Ashes too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.