चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी यजमान पाकला मोठा धक्का; मॅच विनर खेळाडू संघातून 'आउट'

खास वर्ल्ड रेकॉर्डनं वेधलं होतं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 19:26 IST2025-02-07T19:26:00+5:302025-02-07T19:26:49+5:30

whatsapp join usJoin us
Big Blow For Pakistan Saim Ayub Ruled Out Of Champions Trophy 2025 Due To Ankle Injury | चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी यजमान पाकला मोठा धक्का; मॅच विनर खेळाडू संघातून 'आउट'

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी यजमान पाकला मोठा धक्का; मॅच विनर खेळाडू संघातून 'आउट'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pak Saim Ayub Ruled Out of Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या तोंडावर यजमान पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे सईम अयूब याने आगामी मिनी वर्ल्ड कर स्पर्धेतून माघार घेतली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाकिस्तानचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला होता. यातून तो अजूनही सावरला नसून तो जवळपास ५ महिने क्रिकेटपासून दूर राहणार असल्याची पुष्टी झाली आहे.  दीडशेहून  कमी धावसंख्येचा पाठलाग करताना शतकी खेळी करून सईम अयूबनं क्रिकेट जगतात नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. पण धमाकेदार फटबाजी करण्याची क्षमता असणारा या खेळाडूशिवायच पाकच्या संघाला मैदानात उतरावे लागणार आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात घोट्याला फॅक्चर, इंग्लंडमध्ये  उपचार

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) दिलेल्या माहितीनुसार, सईम अयूब याला उजव्या पायाचा घोट्याला फॅक्चर आहे. सध्या तो इंग्लंडमध्ये असून दुखापतीतून सावरत नाही तोपर्यंत तो तिथेच थांबेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाउन कसोटी सामन्यात क्षेत्रकरक्षण करतावेळी त्याला दुखापत झाली होती. थर्ड मॅनच्या दिशेनं जाणारा चेंडू पकडण्यासाठी धावताना त्याचा पाय मुरगळला होता. त्यानंतर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले होते.

पीसीबीनं आधी व्यक्त केला होता तो कमबॅक करेल असा विश्वास, पण.. 

अयूब हा सहा आठवड्यांत या दुखापतीतून रिकव्हर होईल. त्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात सामील होऊ शकतो, असा विश्वास याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधीच्या स्पर्धेत त्याचा पाक संघात समावेश झाला नाही. त्यावेळीच अयूब चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकणार याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्ध नसेल, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

 पाक संघाच्या साखळी फेरीतील भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यासह अन्य लढती

 
१९ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची.
२३ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई.
२७ फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी.


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान संघ:

मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर झमान, कामरान गुलाम, सौद शकील,तय्यब ताहिर,फहीम अश्रफ,खुशदिल शाह,सलमान अली आगा, उस्मान खान,  अबरार अहमद,हरीस रौफ,मोहम्मद हसनैन,नसीम शाह शाहिन शाह आफ्रिदी.
 

Web Title: Big Blow For Pakistan Saim Ayub Ruled Out Of Champions Trophy 2025 Due To Ankle Injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.