WTC अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू झाले जखमी 

ICC World Test Championship Final Update: कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 09:20 AM2021-06-09T09:20:07+5:302021-06-09T09:27:51+5:30

whatsapp join usJoin us
A big blow to New Zealand before the WTC final, Kane Williamson & Mitchell Santner were injured | WTC अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू झाले जखमी 

WTC अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू झाले जखमी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - पहिल्यांदाच कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार असल्याने संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. (World Test Championship Final Update) भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमध्ये हा सामना १८ जूनपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. मात्र या सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. (ICC World Test Championship) कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचे दोन दिग्गज खेळाडू जखमी झाले आहेत. (A big blow to New Zealand before the WTC final, Kane Williamson & Mitchell Santner were injured)

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि फिरकीपटू मिचेल सेंटनर हे दुखापतग्रस्त झाल्याने न्यूझीलंडच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. केन विल्यमसनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या डाव्या हाताचा कोपर दुखावला होता. आता मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. विल्यमसन हा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबचा निर्णय हा सामन्याच्या आधी घेतला जाईल. तर डावखुरा वेगवान गोलंदाज च्रेंट बोल्ट इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुनरागमन करेल. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा १० जूनपासून खेळवला जाणार आहे. 
 
दरम्यान, न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू मिचेल सेंटनर हा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या अंगठ्या जवळच्या बोटाला दुखापत झाली आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाच्या ट्विटर हँडलवरून खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत माहिती देण्यात आली आहे. प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, लॉर्ड्सवर खेळलेले सर्व वेगवान गोलंदाज दुसऱ्या कसोटीत खेळणार नाहीत. ट्रेंट बोल्ट निवडीसाठी उपलब्ध आहे. तर मिचेल सेंटनर जखमी झाल्याने संघाबाहेर आले. विल्यमसनच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली असून, त्याच्याबाबतचा अंतिम निर्णय ९ जून रोजी घेतला जाईल. 

केन विल्यमसन गेल्या काही काळापासून दुखापतींनी त्रस्त आहे. बांगलादेशविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेतसुद्धा तो दुखापतींचा सामना करत होता. त्यामुळे आयपीएलमधील सुरुवातीच्या सामन्यांत तो खेळला नव्हता. तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही तो फारसा यशस्वी ठरला नव्हता. आता न्यूझीलंडच्या कर्णधाराच्या दुखापतीवर भारताचेही बारीक लक्ष असेल. कारण कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्याची कामगिरी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.  

Web Title: A big blow to New Zealand before the WTC final, Kane Williamson & Mitchell Santner were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.