लंडन : पाकिस्तानला आज सर्वात मोठा धक्का बसला असून त्यांना तब्बल 2700 कोटी रुपये भारताला द्यावे लागणार आहे. आयसीसीने एका खटल्यावर आज निर्णय दिला असून त्यानुसार पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) बीसीसीआय तब्बल 2700 कोटी रुपये दंड स्वरुपात द्यावा लागणार आहे.
आयसीसीकडे पीसीबीने बीसीसीआयविरुद्ध एक तक्रार केली होती. ही तक्रार आयसीसीने गंभीरपणे घेत त्यावर सुनावणी करायला सुरुवात केली. आयसीसीने यावेळी दोन्ही देशांचे म्हणणे ऐकून घेतले आणि भारताच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयानंतर बीसीसीआयने पीसीबीविरुद्ध तक्रार दाखल केली. यावर आयसीसीने आज सुनावणी केली.
काय आहे प्रकरणभारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक करार झाला होता. या करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय मालिका खेळवण्यात यावा, हे ठरवण्यात आले होते. पण त्यानंतर दोन्ही देशांतील राजकीय संबंध बिघडले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंचीही पाकिस्ताबरोबर द्विदेशीय मालिका खेळण्याची इच्छा नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयानंतच आम्ही पाकिस्तानबरोबर द्विदेशीय मालिका खेळू शकतो, असे बीसीसीआयने स्षट केले होते. भारत आपल्याबरोबर द्विदेशीय मालिका खेळणार नसल्याचे पाकिस्तानला समजले. त्यानंतर त्यांनी भारताला ताकीदही दिली होती. पण भारताने त्यावेळीही न खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानने नुकसान भरपाईसाठी आयसीसीचे दार ठोठावले होते. त्यावेळी आयसीसीने हे प्रकरण जाणून घेतले आणि भारताच्या बाजूने निकाल दिला होता. या निर्णयानुसार भारताला कोणताही नुकसान भरपाई पाकिस्तानला द्यावी लागणार नव्हती. पण त्यानंतर बीसीसीआयने पीसीबीवरुद्ध याबाबत अजून एक तक्रार केली. या तक्रारीवर आज सुनावणी करण्यात आली. या सुनावणीनुसार पीसीबीला तब्बल 2700 कोटी रुपये बीसीसीआयला दंड स्वरुपात द्यावे लागणार आहे.