Big Breaking : राजस्थान रॉयल्सला धक्का, इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूची IPL 2020 मधून माघार

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020मधील मोसमाच्या तोंडावर राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 04:16 PM2020-02-06T16:16:28+5:302020-02-06T16:42:13+5:30

whatsapp join usJoin us
Big blow for Rajasthan Royals; Jofra Archer out of IPL 2020 with stress facture | Big Breaking : राजस्थान रॉयल्सला धक्का, इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूची IPL 2020 मधून माघार

Big Breaking : राजस्थान रॉयल्सला धक्का, इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूची IPL 2020 मधून माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020मधील मोसमाच्या तोंडावर राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चरनं  आयपीएलमधून माघार घेतली आहे. दुखापतीमु त्यानं हा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या या गोलंदाजाला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती आणि त्याच्या कोपऱ्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. त्याला तीन महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. या कालावधीत तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेलाही मुकणार आहे. 

कोपऱ्यावरील पुढील उपचारासाठी तो बुधवारी लंडनमध्ये दाखल झाला असल्याच्या वृत्ताला इंग्लंड आणि वेल्स मंडळानं दुजोरा दिला.  तो आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या पुनर्वसन प्रोग्राममध्ये सहाभागी होणार आहे. त्यानंतर जूनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून तो कमबॅक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  25 वर्षीय गोलंदाजानं राजस्थान रॉयल्सकडून 11 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत. 2018मध्ये तो 10 सामने खेळला होता आणि त्यात 15 विकेट्स घेतल्या होत्या.  


 
आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही...

यंदाच्या आयपीएल लिलावात राजस्थाननं कोणाला घेतलं?

रॉबीन उथप्पा - 3 कोटी
जयदेव उनाडकट - 3 कोटी
यशस्वी जैस्वाल - 2.40 कोटी
कार्तिक त्यागी - 1.30 कोटी
आकाश सिंग - 20 लाख
डेव्हिड मिलर - 75 लाख 
ओशाने थॉमस - 50 लाख
टॉम कुरण -  1 कोटी
अनिरुद्ध जोशी - 20 कोटी
अँड्य्रु टाय -  1 कोटी


 
राजस्थान रॉयल्स - अंकित राजपूत, बेन स्टोक्स, जोस बटलर, महिपाल लोम्रो, मनन वोहरा, मयांक मार्कंडे, राहुल टेवाटीया, रियान पराग, संजू सॅमसन, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, स्टीव्हन स्मिथ, वरुण अॅरोन, रॉबीन उथप्पा, जयदेव उनाडकट, यशस्वी जैस्वाल, कार्तिक त्यागी, अनुज रावत, आकाश सिंग, डेव्हीड मिलर, ओशाने थॉमस, अनिरुद्ध अशोक जोशी, टॉम कुरण, अँड्रे टे.


राजस्थान संघला विश्वास  
जोफ्रा आर्चर आयपीएल खेळणार नसल्याचे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळानं जाहीर केले. पण, तरीही राजस्थान रॉयल्स जोफ्रा यंदाच्या मोसमात खेळेल, असा विश्वास वाटत आहे. त्यासाठी त्यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी बोलणं सुरु केलं आहे. 

Web Title: Big blow for Rajasthan Royals; Jofra Archer out of IPL 2020 with stress facture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.