ठळक मुद्देमुंबई इंडियन्सचा संघ आज यूएईत दाखल झाला आहेआयपीएलची सर्वाधिक चार जेतेपद मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका आणि मुलगी समायरा हे संघासोबत संयुक्त अरब अमिराती (यूएई) साठी रवाना झाले आहेत. मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सुर्यकुमार आणि त्याची पत्नी देविका ही पण युएईसाठी टीमसोबत रवाना झाली आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघही दुबईसाठी रवाना झाले. तर चेन्नई सुपर किंग्सनं निघण्याची तयारी केली आहे. आयपीएलच्या 13 व्या मोसमासाठी सर्व संघ युएईत दाखल होत असताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
शिक्कामोर्तब : रोहित शर्मासह पाच जणांना 'खेल रत्न' पुरस्कार; हिटमॅन ठरला चौथा क्रिकेटपटू
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ पाचवे आयपीएल जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिक पांड्या बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे आणि त्याच्याकडून तुफान फटकेबाजीची सर्वांना अपेक्षा आहे. त्यात संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडूही वेळेत युएईला पोहोचणार असल्यानं मुंबईचे पारडे आतापासूनच जड मानले जात आहे. असे असताना त्यांचा प्रमुख गोलंदाज सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची बातमी समोर येत आहे.
संघातील अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा सुरुवातीचे काही सामने मुकणार आहे. श्रीलंकेचा 36 वर्षीय गोलंदाज वैयक्तिक कारणास्तव सुरुवातीच्या सामन्यांसाठी यूएईत दाखल होऊ शकणार नाही. मलिंगाचे वडील आजारी आहेत आणि त्यांच्यावर येत्या काही दिवसांत सर्जरी होणार आहे. त्यामुळे तो वडिलांसोबतच राहणार आहे. बीसीसीआयनं अजूनही आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही, त्यामुळे मलिंगा नक्की किती सामन्यांना मुकेल हे सांगणे अवघड आहे. पण, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना होण्याची शक्यता अधिक आहे.
अंबाती रायुडू असता तर टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला असता; निवृत्तीनंतर सुरेश रैनाची फटकेबाजी
मलिंगानं आयपीएलमध्ये 122 सामन्यांत 170 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स त्याच्याच नावावर आहे. त्यानं 19.80च्या सरासरीनं आणि 7.14च्या इकोनॉमीनं ही कामगिरी केली आहे. 2019चे जेतेपद जिंकून देण्यात मलिंगानं महत्त्वाचा वाटा उचलला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CPL 2020 : सनरायझर्स हैदराबादच्या रशीद खानचा ट्वेंटी-20त वर्ल्ड रेकॉर्ड
IPL 2020 पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूची CPL मध्ये तुफान फटकेबाजी!
रोहित शर्मा पत्नी अन् मुलीसह झाला यूएईसाठी रवाना; RCB, DC, CSKनंही घेतली भरारी
Video: खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्...
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीची 'मसल्स' पॉवर; आयपीएलमधील अशक्यप्राय विक्रम नावावर!
Web Title: Big blow to Rohit Sharma-led Mumbai Indians as Lasith Malinga set to miss initial matches of IPL 2020
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.