सततच्या बायो बबलला कंटाळून ऑस्ट्रेलियाचा गोलंदा मिचेल मार्श ( Mitchell Marsh) यानं इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातून ( IPL 2021) माघार घेतली आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी त्याचा हा निर्णय BCCI आणि सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघालाही कळवला आहे. माजी विजेत्या हैदराबाद संघासाठी ( SRH) हा मोठा धक्का म्हणाला लागेल. यूएईत गतवर्षी झालेल्या आयपीएल २०२०मध्ये मार्शला दुखापतीमुळे स्पर्धा सोडावी लागली होती. यंदाही त्यानं माघार घेतल्यानं SRHचा संघ त्याच्या जागी इंग्लंडच्या स्टार खेळाडूला करारबद्ध करण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त Cricbuzzनं दिले आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजानं दिला विराट कोहलीला धक्का; IPL 2021पूर्वी बसला मोठा झटका
आयपीएलच्या नियमानुसार मार्शला ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे आणि त्यानंतर ५० दिवस त्याला या लीगमध्ये खेळावे लागेल. २०२०च्या लिलावात २ कोटींत मार्शला हैदराबादनं करारबद्ध केलं होतं. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली आणि तो माघारी परतला. त्याच्या जागी जेसन होल्डरला ताफ्यात घेतले होते. चार्टर्ड प्लेन न पाठवल्यास मुंबई इंडियन्सचा तगडा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकणार; रोहित शर्माचं टेंशन वाढणार!
त्या दुखापतीतून सावरत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळला होता आणि त्यानंतर बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्स संघाकडून खेळला होता. मागील १० वर्षांत मार्श केवळ २१ आयपीएल सामने खेळला आहे. त्यानं डेक्कन चार्जर्स व पुणे वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. IPL 2021: बाप तशी लेक; रोहित शर्माच्या मुलीनं हेल्मेट घालून लगावला 'हिटमॅन'सारखा षटकार, Video
सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) - रिटेन खेळाडू : केन विलियम्सन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, जॉनी बेयरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, विजय शंकर, मोहम्मद नबी, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, टी. नटराजन, शहबाज नदीम, राशिद खान, बासिल थम्पी, सिद्धार्थ कौल;
लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- जगदीशा सुचिथ (Jagadeesha Suchith) ३० लाख, केदार जाधव ( Kedar Jadhav) २ कोटी; मुजीब उर रहमान ( Mujeeb Ur Rahman) १.५ कोटी
Web Title: Big blow for SRH, Mitchell Marsh opts out of IPL 2021 due to Bio-Bubble fatigue
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.