IPL 2020मधील दुखापत टीम इंडियाला महागात पडणार; दोन प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार!

Indian Premier League ( IPL 2020) नंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या दोऱ्याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 23, 2020 06:40 PM2020-10-23T18:40:36+5:302020-10-23T18:44:27+5:30

whatsapp join usJoin us
Big blow for Team India as Ishant Sharma, Bhuvneshwar Kumar likely to be ruled out of Australia tour: Report | IPL 2020मधील दुखापत टीम इंडियाला महागात पडणार; दोन प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार!

IPL 2020मधील दुखापत टीम इंडियाला महागात पडणार; दोन प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) नंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या दोऱ्याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे आता कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान टीम इंडियाला पेलावे लागणार आहे. पण, या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झालेले इशांत शर्मा ( कसोटी मालिका) आणि भुवनेश्वर कुमार ( वन डे व ट्वेंटी-20 मालिका) ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोन्ही खेळाडू IPL 2020मध्ये खेळत होते. दिल्ली कॅपिटल्सचा इशांत शर्मा नुकताच मायदेशात परतला आहे, तर सनरायझर्स हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारनेही दुखापतीमुळे आयपीएलमधून माघात घेतली. भुवीनं चार सामन्यांत ३ विकेट्स घेतल्या. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार इशांत शर्माला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणान नसल्याचे पक्के आहे. तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेणार आहे. भुवनेश्वरच्या सहभागावरही अनिश्चितता आहे.

''इशांत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. तो आता बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. दोन्ही खेळाडू मागील काही वर्षांपासूत फिटनेसशी झगडत आहेत. इशांतला २०१८/१९च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला मुकावे लागले होते आणि न्यूझीलंड दौऱ्यातही त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागले होते. दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही.  

दरम्यान, या मालिकेसाठी लवकरच संघ जाहीर केला जाईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचा ३२ खेळाडूंचा चमू पाठवण्यात येईल. इशांतच्या अनुपस्थितित मोहम्मद सिराजला कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे. भुवीच्या जागी शार्दूल ठाकूरचे नाव चर्चेत आहे.

भारतच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक-

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

 

Web Title: Big blow for Team India as Ishant Sharma, Bhuvneshwar Kumar likely to be ruled out of Australia tour: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.