IPL 2023: धोनीच्या CSKशी खेळण्याआधी LSG ला मोठा धक्का, केएल राहुलबाबत BCCIने घेतला महत्त्वाचा निर्णय

राहुलला बंगलोर विरूद्धच्या सामन्यात झाली होती दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 09:58 AM2023-05-03T09:58:39+5:302023-05-03T10:05:21+5:30

whatsapp join usJoin us
Big Blow to Gautam Gambhir LSG Ahead of MS Dhoni led CSK clash BCCI will look into KL Rahul Injury case | IPL 2023: धोनीच्या CSKशी खेळण्याआधी LSG ला मोठा धक्का, केएल राहुलबाबत BCCIने घेतला महत्त्वाचा निर्णय

IPL 2023: धोनीच्या CSKशी खेळण्याआधी LSG ला मोठा धक्का, केएल राहुलबाबत BCCIने घेतला महत्त्वाचा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KL Rahul Injury, BCCI: IPL 2023 मध्ये सोमवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना रंगला. विराट कोहली ( Virat Kohli), गौतम गंभीर ( Gautam Gambhir) आणि नवीन उल हक (Naveen Ul Haq) यांच्यातील भांडणामुळे सामन्याची चर्चा झाली. पण त्याच सामन्यात लोकेश राहुललाही ( KL Rahul) दुखापत झाली. वेदनेने विव्हळत त्याने मैदान सोडले. या सामन्यापूर्वी LSGच्याच ताफ्यातील जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकट ( Jaydev Unadkat) याच्या खांद्याला दुखापत झाल्याचे समोर आले होते. या दुखापती गंभीर नसाव्या अशी अपेक्षा भारतीय चाहते करत आहेत. आयपीएल २०२३ नंतर भारताला ७ ते ११ जून या कालावधीत लंडन येथील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध WTC फायनल खेळायची आहे. पण त्याआधी अशा दुखापतींमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढतानाच दिसत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी जाहीर केलेल्या भारतीय संघात लोकेश राहुलचा समावेश आहे. पण राहुलच्या दुखापतीबाबत काही गंभीर बाबी आढळल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सहसा IPLमध्ये एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास, फ्रँचायसी व्यवस्थापन त्याच्याबाबत निर्णय घेत असते. पण राहुल हा भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे क्रिकबझच्या वृत्तानुसार, राहुलच्या प्रकरणात BCCI ने लक्ष घातले आहे. त्यामुळे आता राहुल यंदाच्या हंगामातील उर्वरित IPL सामने खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय थेट NCA म्हणजेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी घेणार आहे. राहुलच्या दुखापतीची व्याप्ती आणि गांभीर्य पाहून त्याची IPL साठीची उपलब्धता ठरवली जाणार आहे.

राहुलला नक्की काय झालं?

सामन्यात LSGचा कर्णधार लोकेश राहुल सुरुवातीच्या षटकात दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. लखनौसाठीच नव्हे तर ही टीम इंडियासाठी मोठी गंभीर बाब ठरली. लोकेशला फिल्डिंग करताना हॅमस्ट्रींग दुखापत झाली अन् तो वेदनेने विव्हळताना दिसला. त्याला नीट चालताही येत नव्हते. त्यामुळे संघाचे टेंशन वाढले. अखेर त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला अन् कृणाल पांड्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. लोकेशची दुखापत किती गंभीर आहे, हे वैद्यकिय बुलेटिननंतर स्पष्ट होईल असे सांगण्यात आले होते त्यानुसार आता BCCI ने त्याच्या दुखापतीबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी NCA कडे सोपवली आहे.

WTC फायनलमध्ये काय करायचं?

जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या संघात लोकेशची निवड झालेली आहे. रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर यांनी आधीच दुखापतीमुळे WTC Final मधून माघार घेतली आहे. केएस भरत हा एकमेव यष्टिरक्षक संघात आहे आणि लोकेशला राखीव यष्टिरक्षक म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. अशात लोकेशच्या दुखापतीने टीम इंडियाचेही टेंशन वाढले आहे. ७ ते ११ जून या कालावधीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये हा सामना होणार आहे. 

Web Title: Big Blow to Gautam Gambhir LSG Ahead of MS Dhoni led CSK clash BCCI will look into KL Rahul Injury case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.