Big bolw to Kolkata Team, IPL 2022 KKR vs PBKS: आज पंजाब किंग्ज (PBKS) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघांकडे दमदार खेळाडू असल्याने हा सामना 'पॉवर हिटिंग'चा सामना असेल यात वाद नाही. पण या सामन्याआधी KKRला मोठा धक्का बसू शकतो. KKRचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल गेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे या सामन्यात त्याच्या संघातील समावेशावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. रसल बाहेर राहिला तर KKRसाठी हा एक मोठा धक्काच मानला जात आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी श्रीलंकेच्या चमिका करुणारत्नेला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
KKR ला बसू शकतो मोठा धक्का
RCB विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रसलने फक्त ३ षटकं टाकली. त्यातही निर्णायक शेवटचं षटक टाकताना त्याने पहिल्या दोन चेंडूत १० धावा देत सामना गमावला. रसलच्या दुखपतीबाबत सामन्यानंतर KKRचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम म्हणाला, रसलने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना डाईव्ह मारली होता. त्यामुळे त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. रसल पूर्णपणे तंदुरुस्त असेल तरच त्याला पंजाबविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरवले जाईल. तो बाहेर बसल्यास त्याच्या जागी मोहम्मद नबी किंवा चमिका करुणारत्ने यांच्या आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहे.
दोनही संघात बदल अपेक्षित
KKRमध्ये दोन बदल होऊ शकतात. रसल बाहेर झाला तर चमिकाला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. तसेच, फलंदाजी मजबूत करण्यासाठी टीम साऊदीच्या जागी शिवम मावी पुनरागमन करू शकतो. पंजाब संघातही बदल होऊ शकतो. संघात वेगवान गोलंदाज संदीप शर्माच्या जागी कागिसो रबाडाला स्थान मिळू शकते. मागील सामन्यात संदीपने ४ षटकांत ३७ धावा दिल्या होत्या, पण त्याला एकही विकेट घेता आली नव्हती.