Mumbai Indians vs CSK, IPL 2023: मुंबई इंडियन्सच्या बाबतीत अकथित आणि नको असलेली परंपरा पूर्ण झाली आहे. हंगामातील पहिला सामना मुंबईने गमावला. आता घरी परतण्याची वेळ आली आहे. घरच्या मैदानावरच नव्हे तर स्पर्धेतही पुनरागमन करण्याची वेळ आली आहे. फक्त वेळच नाही तर गरजही आहे, कारण सर्वात मोठा विरोधक आज त्यांच्यासमोर आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी संघांमध्ये सामना होत आहे. या मोसमातील हा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडेवर खेळला जात आहे. पण नेमका याच सामन्याआधी मुंबई इडियन्सला एक मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. मुंबईच्या संघाने जसप्रीत बुमराहला यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे गमावले आहे. पण आता दुसरा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर देखील दुखापतग्रस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Jofra Archer Injured)
आर्चरला दुखापत, मग संघात कोण?
एका अहवालानुसार, जोफ्रा आर्चरला दुखापत झाली आहे आणि तो आजच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंक आहे. संघाचा कोचिंग स्टाफ असलेला किरॉन पोलार्डने सर्वजण तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते. पण काही वृत्तांवर विश्वास ठेवल्यास आर्चर सावधनतेचा उपाय म्हणून कदाचित आजच्या सामन्यात विश्रांती घेऊ शकतो. जर आर्चरला मुकावे लागले तर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथ संघात येऊ शकतो.
अर्जुन तेंडुलकरला मिळणार संधी?
दरम्यान, मुंबईला एक अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याची सक्तीही होऊ शकते. अशा वेळी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा पर्याय संघाचा उपलब्ध आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तीन सीझनसाठी तो फ्रँचायझीसोबत आहे, परंतु अद्याप त्याने पदार्पण केलेले नाही. त्यामुळे त्याला संघात घेता येऊ शकते. याशिवाय, संघात ऋतिक शोकीनच्या जागी डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेय यालाही संधी मिळू शकते. पियुष चावला मात्र संघात फिट बसलेला आहे.
दरम्यान, गेल्या सलग दहा मोसमाप्रमाणे मुंबईने अकराव्यांदा नव्या मोसमातील पहिला सामना हरण्याची परंपरा पूर्ण केली. आता त्यांना कमबॅक बाबतही इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल. केवळ चॅम्पियनच नाही तर चेन्नईवर एकतर्फी वर्चस्व गाजवणारा हा एकमेव संघ आहे. अशा परिस्थितीत हंगामातील पहिला विजय नोंदवण्याची यापेक्षा चांगली संधी मुंबईला मिळणार नाही.
Web Title: Big blow to Mumbai Indians as Jofra Archer injured before match against Chennai doubtful about playing match Arjun Tendulkar could make debut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.