RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका

राजस्थान रॉयल्सने १६ गुण कमवूनही त्यांची जागा पक्की नाही आणि उर्वरित ३ जागांसाठी अजूनही ७ संघ शर्यतीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 07:04 PM2024-05-13T19:04:05+5:302024-05-13T19:04:26+5:30

whatsapp join usJoin us
Big blow to RR; Jos Buttler will miss the reminder of this IPL 2024 for RR, he left india for T20 world Cup 2024  | RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका

RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Rajasthan Royals : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स हा एकमेव संघ आहे, ज्यांनी प्ले ऑफची जागा पक्की केली आहे. राजस्थान रॉयल्सने १६ गुण कमवूनही त्यांची जागा पक्की नाही आणि उर्वरित ३ जागांसाठी अजूनही ७ संघ शर्यतीत आहेत. RR ने ज्या प्रकारे स्पर्धेत सुरुवात केली होती, ते पाहता ते सर्व प्रथम प्ले ऑफमध्ये पोहोचतील असे वाटले होते. पण, मागील ५ सामन्यांपैकी ३ मध्ये त्यांची हार झाली आणि गणित बिघडले. अशा परिस्थितीत त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले

इंग्लंडचे खेळाडू प्ले ऑफसाठी उपलब्ध नसतील हे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार आज इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर लिएम लिव्हिंगस्टन ( Liam Livingstone ) जो आयपीएल २०२४ मध्ये पंजाब किंग्सकडून खेळतो याने मायदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात राजस्थान रॉयल्सचा जॉस बटलर ( Jos Buttler ) हाही मायदेशात परतला आहे. RR ने त्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात तो संघाला ट्रॉफी जिंका असे आवाहन करून बाय बाय करताना दिसतोय. बटलरने आयपीएल २०२४ मध्ये ११ सामन्यांत दोन शतकांसह ३५९ धावा केल्या आहेत. 


लिव्हिंगस्टन, बटलर यांच्यासह मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, विल जॅक्स, फिल सॉल्ट, रिसे टॉप्ली हेही इंग्लंडच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाचे सदस्य आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत हेही मायदेशात परततील. इंग्लंडचा संघ २२ मे पूर्वी हेडिंग्ली येथे एकत्र येणार आहे. 


 ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा प्राथमिक संघ - जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टली, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रिसे टोप्ली, मार्क वुड

Web Title: Big blow to RR; Jos Buttler will miss the reminder of this IPL 2024 for RR, he left india for T20 world Cup 2024 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.