Join us  

IPL 2023: ग्लेन मॅक्सवेलला पर्याय म्हणून ३.२ कोटी मोजले, त्या खेळाडूनेही RCB ला दाखवला ठेंगा

140 सिक्सर ठोकणारा फलंदाज बाहेर गेल्याने Virat Kohli च्या RCB तगडा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 8:14 PM

Open in App

IPL 2023: स्पर्धेला 31 मार्चपासून सुरू होणार आहे, परंतु अनेक खेळाडू दुखापतींच्या छायेखाली आहेत. त्यामुळे काही फ्रँचायझींना मोठा फटका बसला आहे. WPL या महिला आयपीएल मध्ये Smriti Mandhana च्या RCB संघासाठी स्पर्धा फारच वाईट जात आहे. त्यांनी स्पर्धेतील पहिले पाचही सामने हरले आहेत. त्यामुळे सध्या महिलांचा RCB संघ दु:खात आहे. असे असतानाच Virat Kohli च्या RCB संघासाठीही मोठा धक्का बसला आहे. तब्बल १४० षटकार मारलेला स्टार फलंदाज दुखापीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे.

कोण आहे तो खेळाडू?

स्टार फलंदाज विल जॅक दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात जॅकला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ३.२ कोटींमध्ये करारबद्ध केले होते. त्याला मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेलला कव्हर द्यायचे होते, पण बांगलादेशविरुद्ध मीरपूर येथे झालेल्या दुसऱ्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला स्कॅन आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे.

विल जॅक्सने 140 षटकार ठोकले आहेत

विल जॅक्स हा टी-20 चा जबरदस्त फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 109 सामन्यांच्या 102 डावांमध्ये 29.80 च्या सरासरीने 2802 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 108 धावांच्या नाबाद शतकी खेळीसह 23 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर 140 षटकार-49 चौकार आहेत. जॅक अर्धवेळ गोलंदाजीही करतो. त्याने 42 डावात 26 विकेट्स घेतल्या आहेत. जरी तो आतापर्यंत आयपीएल खेळला नाही.

बदली खेळाडू म्हणून ब्रेसवेलची लागू शकते वर्णी

ESPNcricinfo मधील वृत्तानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल याच्याशी जॅकची संभाव्य बदली म्हणून चर्चा करत आहे. ब्रेसवेल यापूर्वी कधीही आयपीएलमध्ये खेळला नाही. डिसेंबरच्या लिलावातही तो अनसोल्ड राहिला. त्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये आहे. RCB 2 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांच्या घरच्या मैदानावर मे 2019 नंतरचा हा त्यांचा पहिला सामना असेल. रीस टोपले, जॅक सरे यांनाही आरसीबीने लिलावात करारबद्ध केले. हंगामाच्या सुरुवातीला हे दोघे वेळेत तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीग्लेन मॅक्सवेल
Open in App