Join us  

Big Breaking: इंग्लंडच्या सलामीवीराला कोरोना? पाकिस्तान सुपर लीगमधून माघार 

कोरोना व्हायरसमुळे क्रीडा विश्वाला मंगळवारी मोठा धक्का बसला. स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सियाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 2:46 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे क्रीडा विश्वाला मंगळवारी मोठा धक्का बसला. स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सियाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अवघ्या २१ व्या वर्षी त्याला कोरोनामुळे मृत्यूला जवळ करावे लागले. हे वृत्त ताजे असतानाच इंग्लंड क्रिकेट संघाच्या सलामीवीरालाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झालेल्या या फलंदाजाला कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वासीम खान यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे क्रीडा विश्वात आणखी चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने मंगळवारी पाकिस्तान सुपर लीगचे उपांत्य फेरी आणि अंतिम सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. पण, ही लीग रद्द करण्यामागे कोरोना व्हायरस संक्रमित खेळाडू असल्याचं कारण समोर येत आहे. इंग्लंडचा तो खेळाडू मायदेशी परतला असला तरी लीगशी संबंधित सर्व व्यक्तिंची तपासणी सुरू आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासीम खान म्हणाले की,''पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झालेला एक परदेशी खेळाडू कोरोना संशयित आहे. तो त्याच्या देशात परतला आहे.'' सूत्रांच्या माहितीनुसार तो खेळाडू इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्स आहे. तो कराची किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये पसरली आहे. हेल्स मायदेशी परतला असून तो तेथे सर्वांपासून वेगळा राहत आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी त्याचे नाव जाहीर केले. पाकिस्तान सुपर लीगमध्ये हेल्सनं ७ सामन्यांत ५९.७५च्या सरासरीनं २३९ धावा केल्या आहेत.

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Video : रांचीत पोहोचताच MS Dhoni ची बाईक राईड; चाहत्यांना दिला सेल्फी

शोएब अख्तर म्हणतो... 'भारताच्या प्रगतीचा मार्ग पाकिस्तानमधून जातो'!

Shocking : २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा Corona Virusमुळे मृत्यू, क्रीडा क्षेत्रातील पहिला बळी

स्पॅनिश फुटबॉल क्लबच्या ३५% खेळाडूंना Corona Virusची लागण

Corona Virusच्या भीतीनं जग थांबलंय अन् इंग्लंडची क्रिकेटपटू भटकंती करतेय

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर परिणाम? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मोठी अपडेट

MS Dhoni घरी परतताच पत्नी साक्षीनं घेतली शाळा, भरला सज्जड दम

टॅग्स :कोरोनाइंग्लंडपाकिस्तान