India vs Australia : ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. एकामागून एक खेळाडू जखमी होऊन मायदेशात परतत आहेत. आतापर्यंतच्या दोन्ही कसोटी गमावलेल्या ऑस्ट्रेलियासमोर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील स्थान कायम राखण्याचे आव्हान आहे, पण त्यांच्यासमोर नवनवीन संकट उभे राहताना दिसतेय. ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने कौटुंबिक कारणास्तव मायदेशात परतला आहे. जोश हेझलवूडनेही मालिकेतून माघार घेतली आहे आणि त्यात आणखी एकाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे बॉर्डर गावस्कर मालिकेतून बाहेर पडला आहे.
दुसऱ्या कसोटीदरम्यान वॉर्नरला दुखापत झाली होती. टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजचा बॉल थेट वॉर्नरच्या हेल्मेटला लागला, त्यानंतर तो क्रीजवर उभा राहिला पण काही वेळातच तो कोपरला लागला, त्यानंतर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. नंतर एक्स-रेमध्ये त्याला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. वॉर्नरला तंदुरुस्त होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. अशा परिस्थितीत तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला असून तो ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. पहिल्या दोन कसोटीत डेव्हिड वॉर्नर वाईटरित्या फ्लॉप झाला होता. तीन डावात त्याच्या बॅटमधून केवळ २६ धावा निघाल्या.
दिल्ली कसोटीत मॅट रेनशॉला बदली म्हणून खायला देण्यात आले होते. पण आता तो इंदूर आणि अहमदाबाद कसोटीतूनही बाहेर झाला आहे. ३६ वर्षीय माजी उपकर्णधार भारतात होणार्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत पुनरागमन करेल, असा अंदाज आहे. मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर झाले आहेत. दोघांच्या बोटाला दुखापत झाली होती.
- तिसरी कसोटी इंदूर : १ मार्चपासून सुरू होईल
- चौथी कसोटी अहमदाबाद – ९ ते १३ मार्च.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"