ICC ODI world Cup 2023 - भारत - पाकिस्तान यांच्यातल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील तारीख अखेर बदलली. त्यांच्यासह ८ सामन्यांच्या तारखा बदलल्याचे आयसीसीने बुधवारी जाहीर केले. India vs Pakistan हा सामना १५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होता, परंतु आता हा सामना १४ ऑक्टोबरला होणार आहे. नवरात्रीमुळे हा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे.
या सामन्यामुळे इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्ता यांच्यात दिल्ली येथे १४ ऑक्टोबरला होणारा सामना रविवारी १५ ऑक्टोबरला होणआर आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात हैदराबाद येथे १२ ऑक्टोबरला होणारा सामना आत १० ऑक्टोबरला खेळवला जाईल, तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला लखनौ येथील सामना १२ ऐवजी १३ ऑक्टोबरला होईल. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांचाही १४ ऑक्टोबरचा सामना एकदिवस आधी चेन्नईत खेळवला जाणार आहे.
इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातला सामना दिवस रात्र होणार होता, परंतु तो आता सकाळी १०.३० वाजल्यापासून खेळवला जाईल. साखळी फेरीच्या शेवटच्या टप्प्यातही तीन सामन्यांत बदल आहेत. १२ नोव्हेंबरचा ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश ( १०.३० सकाळी) सामना ११ नोव्हेंबरला आणि इंग्लंड वि. पाकिस्तान यांच्यातला कोलकाता येथे होणारा सामना दुपारी २ वाजल्यापासून सुरू होईल.
दरम्यान, भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला ११ नोव्हेंबरचा सामना १२ नोव्हेंबरला बंगळुरू येथे होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील १० शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या २०१९च्या अंतिम सामन्यातील संघांमध्ये ५ ऑक्टोबरला पहिला सामना होईल.
Read in English
Web Title: Big Breaking : India v Pakistan clash among nine World Cup fixtures rescheduled, India Pakistan match advanced to Oct 14, Check full Scheduled
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.