Ravindra Jadeja has handed over the CSK captaincy back to MS Dhoni - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे ( Ravindra Jadeja) सोपवली होती. पण, धोनीचा हा निर्णय फसलेला दिसला. गतविजेत्या चेन्नईला ८ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवता आले आणि जडेजाला कर्णधारपदाचा भार झेपत नसल्याचे दिसले. त्यामुळे धोनीच प्रत्यक्ष मैदानावर नेतृत्व करताना दिसला. रवींद्र जडेजाने अखेर चेन्नईचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने ही जबाबदारी पुन्हा महेंद्रसिंग धोनीकडेच सोपवली आहे आणि धोनीनेही संघहित लक्षात घेता त्याचा स्वीकार केला. जडेजाने त्याच्या खेळावर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
महेंद्रसिंग धोनीचे वय पाहता तो आणखी किती वर्ष आयपीएल खेळेल, याचा अंदाज बांधणे अवघड आहे. त्यामुळेच धोनीने आयपीएल २०२२ला सुरूवात होण्याआधीच जडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते. CSKला पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी धोनीने हा निर्णय घेतला होता. पण, जडेजाने त्याचा आनंद कमी, परंतु तणाव जास्त घेतलेला पाहायला मिळाला. त्याचा परिणाम जडेजाच्या खेळावरही झाला. ८ सामन्यांत जडेजाला २२.४०च्या सरासरीने ११२ धावा करता आल्या आहेत आणि २१३ धावा देत त्याने ५ विकेट्स घेतल्या आहेत.
प्रत्यक्ष मैदानावरही क्षेत्ररक्षणाचे व गोलंदाज बदलण्याचे निर्णय धोनीच घेताना दिसतोय. कर्णधारपदामुळे आलेल्या अपयशामुळे जडेजाची चिडचिड होतानाही दिसली.
Web Title: Big Breaking : IPL 2022 Ravindra Jadeja has handed over the CSK captaincy back to MS Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.