Big changes in ICC ODI World Cup 2023 schedule : भारतात होणार्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या वेळापत्रकात मोठा बदल केला जाऊ शकतो . अहमदाबादच्या मैदानावर १५ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलून १४ ऑक्टोबर करण्यात आली आहे. या एका सामन्यामुळे अन्य काही सामन्यांच्याही तारखा बदलाव्या लागणार आहेत. वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात एक-दोन नव्हे तर सहा सामन्यांमध्ये बदल होणार आहेत.
स्पोर्ट्स तकने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरला होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे १४ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. याशिवाय पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेचा दुसरा सामना १२ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार होता तो १० ऑक्टोबरला स्थलांतरित केला जाऊ शकतो, तर हैदराबादमध्ये ९ ऑक्टोबरला न्यूझीलंड आणि नेदरलँड्स यांच्यात होणारा सामना आता १२ ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो.
या तीन सामन्यांशिवाय इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील चौथा सामना १४ ऑक्टोबर रोजी डे नाईट असा दिल्लीत होणार आहे. हा सामना आधी दिवसा होणार होता. यानंतर न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात १४ ऑक्टोबरला होणारा सामना १५ ऑक्टोबरला हलवला जाऊ शकतो. याशिवाय ९ ऑक्टोबरलाही सामना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप २०२३ च्या वेळापत्रकात एकूण ६ सामने बदलले जाऊ शकतात.
५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवी जाणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने या सुधारित वेळापत्रकाचा ड्राफ्ट संबंधित क्रिकेट बोर्डांना पाठवला आहे आणि त्यांच्या अंतिम मान्यतेनंतर उद्या या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
या सामन्यांमध्ये होणार बदल
वर्ल्ड कप सामना पहिली तारीख शिफ्ट तारीख
भारत विरुद्ध पाकिस्तान १५ ऑक्टोबर १४ ऑक्टोबर
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका १२ ऑक्टोबर १० ऑक्टोबर
न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड ९ ऑक्टोबर १२ ऑक्टोबर
इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान १४ ऑक्टोबर ( संध्या) १४ ऑक्टोबर ( दिवसा)
न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश १४ ऑक्टोबर १५ ऑक्टोबर
Web Title: Big changes in ICC ODI World Cup 2023 schedule; 6 matches date change including India vs Pakistan high-voltage encounter
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.