इंडियन प्रीमिअर लीग २०२४ सुरुवात होण्यास आता फक्त ९ दिवस शिल्लक आहेत. पण, अजूनही रोहित शर्माकडून नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्याच्या मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर वाद सुरूच आहे. आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्या पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये MI ने हार्दिकला गुजरात टायटन्सकडून ट्रेड विंडोतून आपल्या संघात पुन्हा घेतले. नंतर त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. आयपीएल २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० मध्ये MI चे नेतृत्व करणारा रोहित संघात असेल, पण फक्त फलंदाज म्हणून. मुंबईने घेतलेल्या आश्चर्यकारक निर्णयावर बोलताना दक्षिण आफ्रिकेचे महान खेळाडू एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, यामुळे "मोठा वाद निर्माण झाला.''
भारतीय फलंदाजचं जुनं दुखणं पुन्हा सुरू झालं; IPL 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार
"मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा अविश्वसनीयपणे यशस्वी संघ. त्यांनी पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. पण, आता आयपीएल २०२४ मध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या नवा कर्णधार म्हणून येणार असल्याने, गेल्या काही महिन्यांपासून मोठा वाद सुरू आहे. तरीही ते आनंदी दिसत आहेत. त्यांनी पुढचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याला त्याच्या घरच्या संघात पुन्हा पाहणे खूप छान आहे. त्यांचा मुकाबला गुजरात टायटन्सविरुद्ध असेल आणि तो पाहणे मजेशीर असेल," असे डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले.
गतवर्षीचे उपविजेते गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात २४ मार्चला सामना होणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पहिल्याच हंगमात जेतेपद पटकावले आणि त्यानंतर २०२३ मध्ये पुन्हा अंतिम सामन्यात धडक दिली. यावेळी पांड्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे, तर शुबमन गिलकडे गुजरातच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे. २२ मार्चपासून आयपीएलच्या १७ व्या हंगामाची सुरुवात होईल, गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा उद्घाटनीय सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
Web Title: "Big Controversy": South Africa Great AB de Villiers On Hardik Pandya Replacing Rohit Sharma As Mumbai Indians Captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.