भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) हा आता बॅचलर राहणार नाही. सोमवारी म्हणजे आज गोव्यात कुटुंबातील मोजक्याच लोकांसमोर जसप्रीत स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत लग्न करणार आहे. जसप्रीत आणि संजना यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत असताना दोघांच्याही कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संजना गणेशनसोबत लग्नाचे वृत्त असताना व्हायरल झाला जसप्रीत बुमराहचा 'तो' Video
Timesnownews.com नं दिलेल्या वृत्तानुसार जसप्रीतच्या लग्नाआधीच्या सर्व समारंभ ( pre-wedding rituals ) रविवारी पार पडले आणि आता आज लग्न होणार आहे. जसप्रीतच्या लग्नाला फक्त २० पाहुण्यांना उपस्थिती असणार असून त्यांना मोबाईल सोबत राखण्यास मनाई करण्यात आलेली आहे. जसप्रीत-संजना यांच्या लग्नाच्या चर्चा, सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव
संजना गणेशन ही स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओत संजना भारतीय गोलंदाजाची मुलाखत घेत आहे. आप किस की तरफ हो?; सूर्यकुमार यादवनं विचारला होता संजना गणेशनला प्रश्न, जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या चर्चेत ट्विट व्हायरल
Web Title: Big Day: Jasprit Bumrah to tie the knot today with Sanjana Ganesan in Goa, say reports
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.