कराची : नुकत्याच झालेल्या आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपमुळे भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यातून दोन्ही देशांतील गुणवत्तेत मोठे अंतर लक्षात येत असल्याचे मत पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटर जावेद मियाँदाद याने आज व्यक्त केले.
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा तब्बल २0३ धावांनी धुव्वा उडवला होता. मियाँदाद म्हणाला की, ‘विजय आणि पराभव हा खेळाचा एक भाग आहे; परंतु मी जेव्हा उपांत्य फेरीची लढत पाहतो तेव्हा दोन्ही देशांतील खेळाडूंदरम्यानची समज, व्यावसायिक दृष्टिकोन, संरचनात्मक अंतर पाहू शकतो.’ मियाँदादने पाकिस्तानच्या अशा सुमार कामगिरीसाठी पीसीबीच्या अव्यावसायिक दृष्टिकोनाला जबाबदार धरले आहे.
पाकिस्तानसाठी १२४ कसोटी सामने खेळणाºया या फलंदाजाने भारतीय कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले. पाकिस्तानात कोहलीच्या दर्जाचा खेळाडू नसल्याची चिंतादेखील त्याने व्यक्त केली.
मियाँदाद म्हणाला की, ‘भारताच्या यशाचे मुख्य कारण हे विराट कोहली आहे. तो सर्वोत्तम आहे. त्याच्याजवळ जगातील कोठेही धावा करण्याचे कौशल्य, मानसिकता आणि दृष्टिकोन आहे. अनेक कारणांमुळे आम्ही त्याच्या दर्जाचा खेळाडू तयार करू शकत नाही.’
पीसीबीला अंडर १९ क्रिकेट अथवा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यांचे जास्त लक्ष पीएसएलवर आहे. पीएसएलच्या यशासाठीदेखील आम्हाला आमच्या क्रिकेट संरचनेत सुधारणा करावी लागेल.
- जावेद मियाँदाद
Web Title: Big difference between Indo-Pak players: Javed Miandad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.