Join us  

मोठा खुलासा; धोनीला सचिन, सेहवाग आणि गंभीर संघात नको होते

धोनीला आपल्या संघात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद सेहवाग आणि गौतम गंभीर नको होते. हा मोठा खुलासा दस्तुरखुद्द गंभीरनेच केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 3:01 PM

Open in App

मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या सर्व ठिकाणी होताना दिसत आहेत. पण जेव्हा धोनी कर्णधार होता, तेव्हा त्याने संघात मोठे बदल केले होते. त्याचबरोबर संघातील अनुभवी खेळाडूंबद्दल त्याचे चांगले मत नव्हते, असेही पुढे आले आहे. आता तर एक मोठा खुलासा पुढे आला आहे. धोनीला आपल्या संघात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद सेहवाग आणि गौतम गंभीर नको होते. हा मोठा खुलासा दस्तुरखुद्द गंभीरनेच केला आहे.

भारतीय संघ २०१२ साली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी धोनीला भारताच्या अंतिम अकरा जणांच्या संघात सचिन, सेहवाग आणि गंभीर नको होते. या तिघांचेही क्षेत्ररक्षण चांगले नाही, अशी सबब धोनीने दिली होती.

याबाबत गंभीरने इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, " धोनीला मी, सचिन आणि सेहवाग एकत्र भारताच्या संघात नको होतो. आमचे क्षेत्ररक्षण चांगले नाही, असे कारण धोनीने दिले होते. माझ्यासाठी हा सर्वात मोठा धक्का होता."

कॅप्टन कूल' हे बिरूद जगात मिरवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा जोरात सुरू आहे. सर्वोत्कृष्ट 'फिनिशर' म्हणून लौकिक असलेला धोनी वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या डावाला 'फिनिशिंग टच' देण्यात अपयशी ठरला. त्याच्या संथ खेळीवर बरीच टीका-टिप्पणीही झाली-होतेय. त्यामुळेच धोनीच्या निरोपाची वेळ जवळ आल्याचं बोललं जातंय. बीसीसीआयनं तशा हालचाली सुरू केल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, धोनीनं एक मोठा निर्णय बीसीसीआयला कळवलाय. हे निवृत्तीच्या दिशेनं त्यानं टाकलेलं पहिलं पाऊल तर नाही ना, अशी कुजबुज क्रिकेटवर्तुळात सुरू झालीय. 

महेंद्रसिंग धोनी पुढचे दोन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. या कालावधीत निमलष्करी जवानांसोबत 'ऑन फिल्ड' काम करायचं त्यानं पक्कं केलं आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं दिली. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड रविवारी होणार आहे. या दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचा निर्णय धोनीनं निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली यांना कळवला आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवागगौतम गंभीर