पाकिस्तान क्रिकेटला लागले भिकेचे डोहाळे; शाहिन शाह आफ्रिदीच्या उपचारासाठी नाही दिले पैसे, Shahid Afridi ने केली पोलखोल

Pakistan Cricket is again in controversy - पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( PCB) खळबळ माजवणारा दावा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:38 PM2022-09-16T12:38:43+5:302022-09-16T12:39:05+5:30

whatsapp join usJoin us
Big Drama in Pakistan Cricket, Watch Shahid Afridi blast PCB ‘for not providing financial support for Shaheen Afridi’s treatment | पाकिस्तान क्रिकेटला लागले भिकेचे डोहाळे; शाहिन शाह आफ्रिदीच्या उपचारासाठी नाही दिले पैसे, Shahid Afridi ने केली पोलखोल

पाकिस्तान क्रिकेटला लागले भिकेचे डोहाळे; शाहिन शाह आफ्रिदीच्या उपचारासाठी नाही दिले पैसे, Shahid Afridi ने केली पोलखोल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Pakistan Cricket is again in controversy - पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( PCB) खळबळ माजवणारा दावा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) केला आहे. कालच PCBने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. शाहिन शाह आफ्रिदीचे ( Shahin Shah Afridi) पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले. दुखपातीमुळे त्याला आशिया चषक २०२२ स्पर्धेतून मुकावे लागले होते आणि तो लंडनमध्ये उपचारासाठी गेला होता. त्याच्या याच उपचारावरून शाहिद आफ्रिदीने जोरदार टीका केली आहे. शाहिन आफ्रिदी स्वखर्चावर लंडनला गेला अन् उपचार केले असा दावा आफ्रिदीने केला आणि त्यानंतर PCB कडूनही प्रत्युत्तर मिळाले. 

पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ जाहीर, भारताला टक्कर देण्यासाठी स्टार गोलंदाजाची निवड 


पाकिस्तानातील स्थानिक चॅनेलवर बोलताना आफ्रिदी म्हणाला, दुखापतीवर उपचारासाठी शाहिन आफ्रिदी स्वतःच्या खर्चाने गेला होता. त्याने स्वतः डॉक्टर शोधला आणि तेथे जाऊन त्याच्याशी संपर्क केला. PCB ने काहीच केले नाही.


शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी शाहिनचे लग्न होणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याने आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली होती. दुबईहून तो लंडनला रवाना झाला होता. आता तो तिथेच आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड केली गेली आहे. ''शाहिन पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज आहे. पाकिस्तानसाठी खेळताना त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या दुखापतीची काळजी घेण्याची जबाबदारी PCB ची आहे,''असे शाहिद म्हणाला.  

१६ पैकी १० संघ झाले जाहीर, भारताच्या गटातील प्रतिस्पर्धींनी उतरवले तगडे खेळाडू

दरम्यान, PCB ने एक ट्विट करून शाहिद आफ्रिदीचा दावा खोडून काढला. फाखर जमान हाही लंडनमध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी गेला असल्याची माहिती त्यांनी दिली. आशिया चषक स्पर्धेत त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. जमान व शाहिन आफ्रिदी हाही लंडनमध्ये आहे. या दोघांच्या वैद्यकीय काळजी आणि पुनर्वसनाची सर्व काळजी आम्ही घेत आहोत. 

Web Title: Big Drama in Pakistan Cricket, Watch Shahid Afridi blast PCB ‘for not providing financial support for Shaheen Afridi’s treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.