Join us  

आयपीएलमध्ये भारताचा मोठा खेळाडू जखमी, पुढील महिन्यात खेळणार आहे WTC फायनल

भारतीय संघ आयसीसी ट्ऱॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ती संधी आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 5:48 PM

Open in App

भारतीय संघ आयसीसी ट्ऱॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ती संधी आहे... बीसीसीआयनेही त्यासाठी तगडा संघ जाहीर केला. पण, IPL 2023 मध्ये गुजरात टायटन्स (KKR vs GT) विरुद्धच्या सामन्यात उमेश यादवला प्लेइंग 11 मधून वगळण्यात आले. नाणेफेकीला आलेल्या नितीश राणाने शेवटच्या सामन्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंगची समस्या झाल्याचे अपडेट दिले. भारतीय क्रिकेट संघासाठी ही वाईट बातमी आहे, कारण भारताला जून महिन्याच्या सुरुवातीला WTC Final खेळायची आहे.  

१९ चेंडूंत ८० धावा : भारतीय फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला वॉर्निंग; १८ इनिंग्जमध्ये ३ द्विशतकांसह झळकावली ७ शतकं, मोठा विक्रम

 

उमेश यादव दुखापत- नितीश राणा म्हणाला की, उमेश यादवला हॅमस्ट्रिंगची समस्या आहे, त्यामुळे तो खेळत नाही. त्यांच्या जागी हर्षित राणा यांचा समावेश करण्यात आला. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो शमी, सिराजच्या साथीने वेगवान गोलंदाजीला मजबूत करतो. बुमराहच्या अनुपस्थितीत त्याची जागा खास बनते. वेगवान खेळपट्ट्यांवर त्याचा विक्रम चांगला आहे. मात्र, ही दुखापत फारशी गंभीर नसून उमेश यादव लवकरच पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे.

ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता, आता तो बरा आहे पण त्याला क्रिकेटमध्ये परतण्यासाठी अजून किमान ६ ते ८ महिने लागतील. जसप्रीत बुमराहलाही दुखापत झाली आहे, मात्र तो लवकरच पुनर्वसनासाठी बंगळुरूला जाणार आहे. त्याचवेळी श्रेयस अय्यर देखील दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा भाग नाही.

भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गि, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२३
Open in App