१०० टक्के तंदुरुस्त असलेला भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ६ दिवसांत अनफिट झाला अन् त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागली. ३ जानेवारी २०२२ ला बुमराहला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने पूर्णपणे बरा असल्याचे जाहीर केले. त्यामुळेच त्याचा श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत संघात समावेश केला आहे आहे, BCCI ने घोषणा केली होती. पण, ९ जानेवारी २०२२ ला बुमराहला अद्याप गोलंदाजीच्या लयमध्ये येण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यामुळे खरबरादीचा उपाय म्हणून त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतून माघार घ्यावी लागत आहे, BCCI ने जाहीर केले. आता तो पुढील आणखी दोन महत्त्वाच्या मालिकांना मुकणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, बुमराह आगानी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला ( ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे) आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ( ४ कसोटी) मालिकेतूनही बाहेर होऊ शकतो. बुमराहच्या उजव्या हाताला ताण आला आहे. अशा परिस्थितीत तो सध्या रिकव्हरी करत आहे. बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भाग घ्यायचा होता पण त्यालाही वगळण्यात आले आहे. बुमराहला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी पाठीला दुखापत झाली होती, जो आता पूर्णपणे बरा झाला आहे. बुमराहने NCA बंगळुरू येथे त्याची फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली होती. पण दुसऱ्या दिवशी त्याला मुंबईत अडचण जाणवली, अशा स्थितीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धची निम्मी मालिका मुकू शकतो. अशा परिस्थितीत तो थेट आयपीएल २०२३ मध्ये खेळताना दिसू शकतो.
संघ व्यवस्थापनही बुमराहबाबत धोका पत्करू इच्छित नाही. याआधी बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांसाठी संघाचा भाग होता पण तो गुवाहाटीला पोहोचला नाही तेव्हा तो या मालिकेतून बाहेर पडल्याचे जाहीर करण्यात आले. येथे व्यवस्थापन बुमराहकडे पूर्ण लक्ष देत आहे की हा गोलंदाज लवकरात लवकर बरा व्हावा. कर्णधार रोहित शर्मानेही बुमराह नेटमध्ये गोलंदाजी करत होता आणि तो परतण्यास तयार होता, मात्र त्याच्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा करता येणार नाही, असे म्हटले आहे.
तो म्हणाला, 'आम्हाला वाटले की त्याला मालिकेतून बाहेर काढणे योग्य ठरेल, तसेच तसे केले. आम्ही त्याला संघात निवडले तेव्हा तो कामाचा ताण पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत होता. तो नेटमध्ये गोलंदाजी करत होता. मग त्याला घट्टपणा जाणवला. विश्वचषकापूर्वी त्याला मोठी दुखापत झाल्यामुळे आपल्याला त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"